गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला; दोन गायींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:06 AM2021-02-10T00:06:37+5:302021-02-10T00:06:57+5:30
पाच जणांवर पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलादपूर : तालुक्यात गुरांची चोरटी वाहतूक सुरूच असून, यापूर्वीही अवैध वाहतूक करणारी वाहने पकडून पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. सोमवार रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास तालुक्यातील पळचील ते कशेडी बंगला रोडवर गुरांची अवैद्य वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला आहे. याबाबत पळचिल येथील प्रवक्ता सूरज गोपाळ मोरे यांनी पोलादपूर पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी ५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
आरोपी गणेश बाबाजी समजिस्कर (५०, राहणार रावढल ता.महाड), अकबर इब्राहिम जोगीलकर (३०, राहणार कुंभर्डी ता.महाड), सबब अहमद कोंडेकर (२३), मुराद ईशामुद्दिंग तळघरकर (४२), सज्जाक सलाम अंजलेकर (१५) हे तिघे रा.शिरवली तालुका महाड येथील आहेत. त्यांच्या ताब्यातील पिकप क्रमांक एम एच ०६ ए जी ८०२८ मध्ये ६ गायी, १ बैल, ४ लहान वासरे असे एकूण ११ जनावरे पुरेशी जागा नसतानाही त्यांना हालचाल करता येत नाही, अशा रीतीने दाटीवाटीने भरून त्यांना चारा, पाणी, हवा मिळत नसताना, याची तजवीज न करता, तसेच त्यांच्याकडे गुरांचा वाहतूक करण्याचा परवाना नसताना, त्यांची निष्काळजीपणाने वाहतूक करून, त्यातील दोन गायींच्या मृत्यूस कारणीभूत झाले. पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संदीप शिरगावकर हे करीत आहेत.