सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:36 AM2019-01-21T00:36:30+5:302019-01-21T00:36:32+5:30

सध्या स्मार्टफोन व इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली.

Police fail to crack cyber crimes | सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी

सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी

Next

- गिरीश गोरेगावकर 
माणगाव : सध्या स्मार्टफोन व इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. मात्र, गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आलेले नाही. किंबहुना गुन्ह्यातील आरोपी मोकाटच आहेत. रायगडमधील २०१८ मध्ये घडलेल्या ५३ गुन्ह्यांतील १२ गुन्ह्यांची उकल होऊन ४१ गुन्हे अजून उघडकीस आले नाहीत. यामुळे पोलीस यंत्रणा सायबर गुन्ह्याची उकल करण्यात अपयशी ठरले आहेत.
एटीएम खात्यातून पैसे लंपास करणे, लॉटरी लागल्याच्या आमिषाने फसवणूक, क्रे डिट कार्डचा सांकेतिक शब्द चोरून त्याद्वारे खरेदी करणे, फेसबुकवर बदनामी करणे किंवा अश्लील मजकूर टाकणे अशा अनेकविध तक्र ारी रायगड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे नागरिकांकडून केल्या जात आहेत. डिजिटल इंडिया संकल्पनेतून सुरू झालेले कॅशलेस व्यवहार आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आॅनलाइन गुन्हे वाढू लागले आहेत. ओळख लपवून इंटरनेटवर गंभीर गुन्हे सहज करता येतात. एटीएम स्कीमिंग, आॅनलाइन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे अशा गुन्ह्यांचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मागील तीन वर्षांतील जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांची संख्या पाहता फक्त २२ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित गुन्ह्यांतील आरोपी अद्यापही मोकाट आहेत.
बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी हे परराज्यातील असल्याने त्यांना पकडण्यासाठी उशीर होतो. बऱ्याचशा बाबी या तांत्रिक असल्याने त्याची तपासणी व्हायला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात गुन्हे डिटेक्शनचे प्रमाण चांगले असल्याची माहिती पोलीस जिल्हा अधीक्षक अनिल पारसकर यांनी‘लोकमत’ला बोलताना दिली.
।या गुन्ह्याची उकल करण्यास उशीर होण्याचे कारण गुन्हा तपासात जे सर्व्हर असतात ते परदेशी असतात, तेथून माहिती मागविताना उशीर होतो. तसेच पूर्वी सीमकार्ड बनावट नावाने विकली जात होती, ती आता बनावट सीम कार्ड विक्र ी बंद झाली आहे. २०१६ साली सायबर सेल लॅब चालू झाली आहे. याबाबत पोलिसांची ट्रेनिंग पूर्ण झाली आहे. त्यामुळे या गुन्ह्याची उकल भविष्यात लवकर होईल.
- अनिल पारसकर,
जिल्हा पोलीस अधीक्षक,
अलिबाग
नागरिकांनीच जागरूक व्हावे
रायगड पोलीस दलातील सायबर सेलचे पोलीस निरीक्षक एन. एम. गवारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी. मोबाइलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लीक करू नये, जाणकारांकडून आर्थिक व्यवहार माहीत करून घ्यावे. बँक अधिकाºयांनी देखील नागरिकांना बँकिंग व्यवहाराची माहिती द्यावी.

Web Title: Police fail to crack cyber crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.