पोलिसांनी दिली हुतात्म्यांना मानवंदना
By admin | Published: September 26, 2016 02:16 AM2016-09-26T02:16:17+5:302016-09-26T02:16:17+5:30
चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ८६ व्या हुतात्मा दिनानिमित्त पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
उरण : चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ८६ व्या हुतात्मा दिनानिमित्त पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. या प्रसंगी शासन व उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.
चिरनेर जंगल सत्याग्रहात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम चिरनेर ग्रामपंचायतीने राजिप, उरण पंचायत समितीच्या मदतीने आयोजित केला होता. राजिप अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या हुतात्मा दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार मनोहर भोईर, आ. प्रशांत ठाकूर, माजी आ. विवेक पाटील, राजिप उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, राजिप सदस्य तुकाराम कडू, वैजनाथ ठाकूर, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, उपंस प्रभारी सभापती भास्कर मोकल आदी उपस्थित होते.
यावेळी हुतात्म्यांना पोलिसांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. (वार्ताहर)