पोलीस अधिकाऱ्याची ‘संवेदनशिलता’ आणि नगराध्यक्षाची ‘सामाजिक बांधिलकी’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 01:38 PM2018-03-12T13:38:50+5:302018-03-12T13:38:50+5:30

अलिबागच्या एसटी बस स्थानकावर ‘पोलीस भरती करिता आलेल्या उमेदवारांकरता राहाण्याची व्यवस्था’ असा फलक दिसला.

Police officer's 'sensibility' and 'social commitment' of city police | पोलीस अधिकाऱ्याची ‘संवेदनशिलता’ आणि नगराध्यक्षाची ‘सामाजिक बांधिलकी’

पोलीस अधिकाऱ्याची ‘संवेदनशिलता’ आणि नगराध्यक्षाची ‘सामाजिक बांधिलकी’

Next


- जयंत धुळप

अलिबाग- राज्यभरातील विविध जिल्ह्यातून रायगड पोलीस दलातील ७६ पुरुष व ३३ महिला अशा एकूण १०९ जागांसाठी एकूण ९ हजार ९६५ पुरुष तर २हजार ०९० महिला उमेदवार असे एकूण १२ हजार ०५५ उमेदवार रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग शहरात रविवारी दुपार पासून येण्यास प्रारंभ झाला. अलिबागच्या एसटी बस स्थानकावर ‘पोलीस भरती करिता आलेल्या उमेदवारांकरता राहाण्याची व्यवस्था’ असा फलक दिसला. आणि त्या खालील दिशादर्शक बाणाच्या दिशेने हे उमेदवार अरुणकुमार वैद्य हायस्कूलच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मोफत निवारा शामियानात पोहोचले. आणि अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे आणि अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या आपल्या नात्याच्या नसलेल्या उमेदवारांसाठीची मानवी संवेदनशिलता पाहून हे सारे उमेदवार चक्क भारावूनच गेले होते.
प्रतिकूल परिस्थितीवर मार्ग काढण्याकरीता एका पोलीस अधिकाऱ्यांची अस्वस्थता
राज्यभरात कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस भरती करता हजारो उमेदवार केवळ नोकरीच्या अपेक्षेने येत असतात. एखाद्या हॉटेलमध्ये राहून पोलीस भरतीकरित जाणे हे या आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांकरीता केवळ अशक्य असते. परिणामी हे सारे उमेदवार बसस्थानके, उघडी मैदाने, फूटपाथ अशा ठिकाणी अपरिहार्यतेने आपली सतरंजी वा प्रसंगी कागद पसरुन रात्री झोपून रात्र कशीबशी काढतात, प्रातर्विधी आणि अंघोळीची सोय नाही. आणि अशाच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीस हे उमेदवार पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीस जातात. अपुऱ्या झोपेमुळे अनेक उमेदवारांना मैदानी चाचणीच्यावेळी चक्कर येण्या सारखे प्रकार घडतात. आणि त्यातूनच उत्तीर्ण-अनुत्तीर्णतेचा निर्णय होतो. कोणत्याही परिक्षेसाठी परिक्षार्थी उमेदवाराची मानसिकता शांत असली पाहीजे, त्याकरिता त्याची झोप व्यवस्थित झालेली असली पाहीजे, कोणत्याही गैरसोयीचा तणाव त्याच्या मनावर नसला पाहीजे. अशा सर्व पाश्र्वभूमीवर नव्याने पोलीस दलात दाखल होण्याकरीता येणाऱ्या या उमेदवारांच्या निवाऱ्याकरीता आपण काहीतरी केले पाहीजे असा विचार गेल्या दोन-तिन पोलीस भरती पासून अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांच्या संवेदनशिल मनाला सतत अस्वस्थ करित होता.

संवेदनशिल अस्वस्थतेला, नगराध्यक्षांच्या सामाजिक बांधीलकीची गवसली साथ
वराडे यांनी आपल्या मनातील हा अस्वस्थ करणारा  विचार अलिबागचे सामाजिक मानसिकतेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना भेटून त्यांना सांगीतला. नगराध्यक्ष नाईक यांना देखल हा विचार मनापासून पटला. आपल्या नगरीत येणाऱ्या उमेदवारांचे आपण किमान आदरातिथ्य करायला हवे, या सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून नाईक यांनी वराडे यांच्या समवेत पोलीस मुख्यालयाच्या मार्गावरील जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कुलचे मैदान गाठले. पहाणी केली आणि तेथे तत्काळ मोठा शामियाना उभारण्याचा निर्णय घेतला. प्रशांत नाईक मित्र मंडळाने स्वखर्चातून शामियानाची उभारणी तर नगरपरिषदेच्या माध्यमातून पाण्याची व शौच्चलयाची व्यवस्था नगराध्यक्ष नाईक यांनी करुन देवून वराडे यांच्या ताब्यात हा शामियाना दिला.

त्यांचे कोणीही नातेवाईक नसतात मोफत राहाण्याची सोय 
रविवारी संध्याकाळपर्यंत दोन हजार उमेदवार येथे दाखल झाले. शामियानातील मोफत निवास व्यवस्था पाहून ते सारे थक्कच झाले. यापूर्वी चार वेळा अत्यंत हलाखिच्या अवस्थेत पोलीस भरतीस गेलेल्या उस्मानाबाद मधून आलेल्या रमेश खडके या उमेदवाराने अत्यंत भावूक प्रतिक्रीया दिली. तो म्हणाल, राहायला पैसे देणे केवळ अशक्य होते म्हणून मी आणि माझे मित्र या पूर्वीच्या भरतीच्यावेळी एसटी बस स्थानकावर झोपलो होतो. आमच्याकडे पर्यायही नव्हता. पण आज येथे अलिबागचे पोलीस निरिक्षक आणि अलिबागचे नगराध्यक्ष यांनी आम्ही त्यांचे कोणीही नातेवाईक नसतात ही मोफत राहाण्याची सोय केली, याच्या बद्दल काय म्हणावे हे खर सुचत नाही. आम्ही त्यांना भेटून नक्की आभार व्यक्त करणार आहोत, असे खडके याने सांगीतले. देशाकरीता बलिदान दिलेले आपले माजी लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य ज्या शाळेत शिकले, त्याच शाळेच्या मैदानावर आम्ही राहीलो होतो, ही गोष्ट आम्ही कधीच विसरु शकणार नाही, अशी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिक्रीया परभणी जिल्ह्यातून आलेल्या राकेश सरके या उमेदवाराने दिली.

राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस भरती करिता आदर्शवस्तूपाठ
अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांची संवेदनशीलता आणि अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची सामाजिक बांधीलकी असे आदर्शसुत्र ,राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस भरतीच्यावेळी अमलात आले तर राज्याच्या पोलीस दलात नव्याने येणाऱ्या तरुण उमेदवाराची केवळ सोयच होईल असे नाही तर पोलीस दलात दाखल होताना या उमेदवारांमध्ये समाजाप्रती एक सकारात्मक मानसिकता  प्रथम पासूनच निर्माण होवून, राज्याच्या पोलीस दलात समाजाप्रती सकारात्म पोलीस येत्या काळात आपल्याला पहायला मिळतील, असा आदर्श वस्तूपाठ वराडे आणि नाईक यांनी घालून दिला आहे

Web Title: Police officer's 'sensibility' and 'social commitment' of city police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.