श्रीवर्धनमध्ये ९७७ लोकांमागे एक पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 05:00 AM2018-09-17T05:00:08+5:302018-09-17T05:00:37+5:30
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंदोबस्तामुळे तालुक्यातील पोलिसांची दमछाक
श्रीवर्धन : राष्ट्रीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने श्रीवर्धन तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे. १९९२ च्या कटू आठवणी मनाला दु:खी करतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील तालुक्यात श्रीवर्धनचा समावेश होतो. आजमितीची श्रीवर्धनची लोकसंख्या व पोलीसठाण्यातील कार्यरत कर्मचारी वर्ग यांच्या संख्येचे गुणोत्तर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
श्रीवर्धन तालुक्याची लोकसंख्या ८५०४० च्या जवळपास आहे. तालुक्यातील पोलीस ठाण्यात एकूण कर्मचारी संख्या ८७ आहे. तालुक्यातील ९७७ व्यक्तींच्या सुरक्षेसाठी अवघा एक पोलीस कर्मचारी उपलब्ध होत आहे. तालुक्यात श्रीवर्धन शहर व (दिघी सागरी) बोर्लीपंचतन येथे पोलीस ठाण्यात मंजूर संख्या ४ अधिकारी, ५१ कर्मचारी इतकी आहे. मात्र, प्रत्यक्षात दोन पोलीस अधिकारी ३६ कर्मचारी कार्यरत आहेत. पैकी अत्यावश्यक कामगिरीकरिता नेमण्यात येणाऱ्या कर्मचाºयांची संख्या २७ इतकी आहे.
पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. यात चोरी, लुटमारीच्या घटनांची संख्या मोठी आहे. श्रीवर्धन पोलिसांनी १४८ घडलेल्या गुन्ह्यांपैकी १३१ गुन्हे उघड केले. उर्वरित १८ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
तालुक्यातील अपुºया मनुष्यबळात व्हीआयपी सुरक्षा, मोर्चे, आंदोलने, सण उत्सव, उपोषणे व गुन्हे तपास करताना पोलीस यंत्रणेवर ताण येतो. याशिवाय सागरीकिनाºयांच्या सुरक्षेकडेही नेहमीच लक्ष द्यावे लागत असल्याने तालुक्यातील पोलीस दलातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.