रोह्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी गिरवले मानसशास्त्राचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:05 AM2019-11-20T00:05:20+5:302019-11-20T00:05:26+5:30
मार्गदर्शन शिबिर; जीवनात समाधानी असणे गरजेचे
रोहा : रोहा पोलीस ठाण्यात मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांच्या माध्यमातून माणसशास्त्रज्ञ सतीश बापर्डेकर यांनी पोलीस कर्मचारी यांना माणसशास्त्राचे धडे दिले. रोजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, कौटुंबिक समस्या, मुलांचे प्रश्न, मानसिक ताण आणि अन्य समस्यांवर उपाय या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, प्रकाश महाजन, सुरेश पाताडे व पोलीस शिपाई कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
जीवनात अनेक खाचखळगे व आव्हानांचा सामना रोजच्या रोज करावा लागतो. हे करताना घर, नातेवाईक, कुटुंब व मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे सारखी चिडचिड होते. मन आणि बुद्धी यांच्या एकाग्रतेवर लक्ष केंद्रित करायचे असेल तर शांतता किंवा योग प्रकार करणे जितके आवश्यक आहे. तेवढेच जीवनात समाधानी असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ उत्तम राहते आणि आत्मविश्वास वाढतो आणि संयम बळावत असल्याचे मार्गदर्शन सतीश बापर्डेकर यांनी भाष्य केले.