रायगड जिल्ह्यात ४२२ रिक्त पदासांठी २१ जूनपासून पोलीस भरती; ३१ हजार ६३ अर्ज दाखल

By निखिल म्हात्रे | Published: June 17, 2024 06:09 PM2024-06-17T18:09:47+5:302024-06-17T18:11:03+5:30

नेहूली येथील क्रिडा संकुलात पार पडणार प्रक्रिया

Police Recruitment for 422 Vacancies in Raigad District from June 21 as 31 thousand 63 applications filed | रायगड जिल्ह्यात ४२२ रिक्त पदासांठी २१ जूनपासून पोलीस भरती; ३१ हजार ६३ अर्ज दाखल

रायगड जिल्ह्यात ४२२ रिक्त पदासांठी २१ जूनपासून पोलीस भरती; ३१ हजार ६३ अर्ज दाखल

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: रायगड जिल्ह्यात ४२२ पोलीस पदांसाठी ३१ हजार ६३ अर्ज दाखल झाले आहेत. ही भरती २१ जूनपासून नेहूली येथील क्रिडा संकुलात पार पडणार आहे. तब्बल ३० दिवस ही भरती प्रक्रिया सुरु राहणार आहे. अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती होणार असून कुठल्याही प्रकारे गैरव्यव्हार होणार नाही याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस शिपाईपदासाठी (बॅन्ड्समन समाविष्ठ ९ पद) ३९१ व चालक पोलीस शिपाई ३१ पदांसाठी ही भरती होणार आहे. पोलीस शिपाई पदाकरीता २३ हजार ७९३ पुरुष, तर ४ हजार ८६० महिला असे एकुण २८ हजार ८३३ अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर चालक शिपाई पदाच्या ३१ रीक्त जागांसाठी २ हजार २३० अर्ज प्राप्त झाले असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

या पोलिस भरतीसाठी कोणत्याही व्यक्तीकडुन ओळखीचे, आमिष दाखवून, पैशांची मागणी करीत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तात्काळ पोलीस अधिक्षक कार्यालय, दुरध्वनी क्रमांक या ०२१४१-२२८४७३, ८६०५४९४७७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

भरतीचे ठिकाण

  • जिल्हा क्रिडा संकुल नेहुली येथे कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप, १०० मीटर धावणे व गोळा फेक चाचणी.
  • आर.सी.एफ कॉलनी कुरुळ येथे १६०० व ८०० मीटर धावणे चाचणी.


पोलिस विभागाकडून देण्यात आलेल्या सुविधा

  • पोलीस भरतीकरीता येणा-या उमेदवारांना जिल्हा क्रिडा संकुल नेहुली येथे बॅडमिंटन हॉलमध्ये एकावेळी सर्व उमेदवार बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
  • जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवारांना पुढील सुयोग्यतारीख दिली जाणार आहे.
  • काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमदेवारांना दुसरी तारीख दिली जाईल.
  • काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल.

Web Title: Police Recruitment for 422 Vacancies in Raigad District from June 21 as 31 thousand 63 applications filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.