लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये पोलिसांचा रुटमार्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 03:36 PM2024-03-23T15:36:15+5:302024-03-23T15:39:14+5:30
जासई नंतर उरण चारफाटा पासून मोरा -भवरा,उरण शहर आणि कोट नाका पर्यंत पोलिसांनी रुटमार्च केले.
उरण : मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (२३) उरण परिसरात ठिकठिकाणी पोलिसांनी रुटमार्च केले.
मावळ लोकसभेची निवडणूक १३ मे रोजी जाहीर झाली आहे.लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी उरण पोलिसांनी शनिवारी रुटमार्च केले.न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कांबळे आणि मोरा सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सशस्त्र रुटमार्चमध्ये आरसीएफचे तीन अधिकारी,३२ कर्मचारी आणि ८ एपीआय, पोलिस उपनिरीक्षक व ३० पोलिस अंमलदार शस्त्र ,लाठी, हेल्मेट वाहनांसह सहभागी झाले होते.
जासई नंतर उरण चारफाटा पासून मोरा -भवरा,उरण शहर आणि कोट नाका पर्यंत पोलिसांनी रुटमार्च केले. या दरम्यान परिसरातील महत्वाची, संवेदनशील आणि लोकवस्तीच्या ठिकाणी जनजागृती करुन निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.