बाजारपेठावर पोलिसांची नजर, चैन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलिसांनी उचलले पाऊल
By निखिल म्हात्रे | Published: August 30, 2022 12:28 PM2022-08-30T12:28:31+5:302022-08-30T12:28:41+5:30
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सध्या बाजारपेठा चांगल्याच सजल्या असून विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी नागरीकांना गर्दी केली आहे.
अलिबाग -
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सध्या बाजारपेठा चांगल्याच सजल्या असून विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी नागरीकांना गर्दी केली आहे. या दरम्यान होणारी चैन चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून बाजार पेठेच्यामुख्य प्रवेश द्वारावर व शेवटच्या टोकाला बॅरीगेट्स ही लावण्यात आले आहेत. तसेच दामिनी पथकाच्या बाजारपेठेत फे-या वाठविण्यात आल्या आहेत.
उत्सवाच्या दरम्यान महीला वर्गात एक वेगळाच उत्साह असतो. या दरम्यान महीला बाहेर पडताना दागिने अंगावर परीधान करुन बाहेर पडत असतात. मात्र या दिवसात चैन साखळी चोरीच्या प्रमाणात वाढ होत असायची. याला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी विविध शक्कल लढवित चो-या रोखण्यासाठी विविध उपाय-योजना आखल्याआहेत.
बाजार पेठेत असलेल्या गर्दीचा फायदा घेत सोन-साखळी चोर सोन्याचे दागीने लांबवित असत. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान असायचे. मात्र यावर्षी या सा-या घटनांपासून छुटकारा मिळण्यासाठी बाजारपेठांमध्ये चोख बंदोबस्त
ठेवण्यात आला आहे. तसेच बाजारपेठ परीसरात चारचाकी वाहन नेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नागरीकांनी ही पोलिसांना सहकार्य करावे असे अवाहन ही पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्यवाच्या खरेदीसाठी बाहेर पडताना महीला वर्गाने सोन्याचे दागीने घालून बाहेर पडू नये, याबरोबरच कोणताही मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये. तसचे आपल्या हातातील पैशांची पर्स व्यवस्थित सांभळावी असे केल्यास चोरीच्या घटनांमध्येही घट होणार असल्याचे अलिबाग ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय जाधव यांनी सांगितले.
ॉअलिबाग महाविर चौकातील फुलोरा हॉटेल परीसरात बॅरीगेट्स लावण्यात आले असून ठिकरुळ नाका, केळकर नाका, शिवाजी चौक, जामा मसिद परीसर, मारुतीनाका अशा बाजारपेठांच्या प्रवेशद्वारावरच हे बॅरीगेट्स लावण्यात आले आहेत.
त्यामुळे यावर्षी उत्सवा दरम्यान चैन स्नॅचिंगचे प्रमाण कमी होणार हे निश्चित.