पोलिसांनी खोपोलीत केला २१८ कोटींचा मॅफेड्रॉन साठा जप्त 

By निखिल म्हात्रे | Published: December 11, 2023 09:58 PM2023-12-11T21:58:57+5:302023-12-11T21:59:53+5:30

ज्याची किंमत १०८ कोटी एवढी होती.

police seized mephedrone stock worth 218 crore in khopoli | पोलिसांनी खोपोलीत केला २१८ कोटींचा मॅफेड्रॉन साठा जप्त 

पोलिसांनी खोपोलीत केला २१८ कोटींचा मॅफेड्रॉन साठा जप्त 

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग- रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा १७४ किलो वजनाचे मॅफेड्रॉन पोलिसांनी जप्त केले आहे. ज्याची बाजारातील किंमत २१८ कोटी आहे. खोपोली येथील ढेकू गावात एका इलेक्ट्रिकल पोलीस बनवणाऱ्या कंपनीत बेकायदेशीरपणे एमडी पावडर तयार केली जात असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी धाड टाकून केलेल्या कारवाई ८५ किलो मॅफेड्रॉन जप्त केले होते ज्याची किंमत १०८ कोटी एवढी होती.

याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून खोपोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी होणार गावातील एका गोडाऊन वर पुन्हा कारवाई केली. १७४ किलो मॅफेड्रॉन बॅरल्समध्ये लपवून ठेवल्याचे आढळून आले. ज्याची बाजारातील किंमत २१८ कोटींच्या आसपास आहे.

त्यामुळे या प्रकरणात आत्तापर्यंत ३२५.४२ कोटी रुपये किमतीचा एमडी पावडर साठा जप्त केला आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपींनी काही अमली पदार्थ परदेशातही पाठवण्याचे पाठविल्याचे समोर आले आहे. त्याचा तपास सुरू आहे अशी माहिती कोकणपरिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी खोपोलीत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.

Web Title: police seized mephedrone stock worth 218 crore in khopoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.