दूरध्वनी आणि त्यानंतर आता आधुनिक मोबाइल फोन्स जरी अस्तित्वात आले असले तर राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील पोलीस यंत्रणा आपली संभाषण गुप्तता अबाधित राखण्याकरिता आजही वायलेस अर्थात बिनतारी संदेश यंत्रणाच वापरते. ही बिनतारी यंत्रणा ब्रिटिश काळापासून पोलीस दलात वापरण्यात येत आहे अशी माहिती रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील यांच्याकडून कुरुळ-अलिबाग येथील सु.ए.सो. माध्यमिक विद्यालयातील ‘लोकमत महापत्रकार टीम’ला प्राप्त झाली आहे. बालदिनानिमित्ताने लोकमत आयोजित ‘महाराष्ट्राचे भावी महापत्रकार’या उपक्रमांतर्गत सु.ए.सो. माध्यमिक विद्यालयातील बाल पत्रकारांनी रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली. यावेळी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयांतील विविध विभागाची पाहणी या बाल पत्रकारांच्या टीमने करु न माहिती घेतली.बाल अत्याचार प्रतिबंधाकरिता जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत तक्रार पेटी-राज्यात बाल अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यास आळा घालण्याकरिता जिल्ह्यात काय उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत असा प्रश्न केला असता, अप्पर पोलीस अधिक्षक पाटील यांनी याबाबत सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक शाळे जवळ शाळा भरण्याच्यावेळी व सुटण्याच्यावेळी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त मोटरसायकलवरील महिला पोलिसांची ‘दामिनी पथके’ विद्यार्थीनी व महिलांच्या सहाय्याकरिता सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्यातून अनेक संभाव्य अनुचित प्रसंगाना आळा देखील बसला आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटी देण्याचा मानस आहे. विद्यार्थीनींनी आपली तक्रार आपल्या नावे वा निनावी या तक्रार पेटीत टाकावी, त्यांची शहानिशा करुन तत्काळ कारवाई देखील करण्यात येईल असा विश्वास पाटील यांनी दिला. बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंध कायदा (पॉस्को) याची माहिती त्यांनी करुन दिली.जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी झाला, थेट उप विभागीय पोलीस अधिकारी-आपले प्राथमिक शिक्षण मिरजमधील एरोंडोली गावातील जिल्हा परिषद शाळा क्र. २मध्ये झाल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगून, पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन(एमपीएससी)ची परीक्षा उत्तीर्ण होवून पूढील प्रशिक्षणानंतर थेट उप विभागीय पोलीस अधिकारी(डी. वाय. एस. पी) या पदावर आपण रुजू झालो असून आठ वर्ष या पदावर कार्यरत असल्याचे सांगितले.पोलीस सेवेत दाखल होण्याकरिता चार पर्याय उपलब्ध-अत्यंत आदर, सन्मान आणि समाधान प्राप्त होवू शकणारे क्षेत्र म्हणजे ‘पोलीस’ हे क्षेत्र आहे. या क्षेत्रात पोलीस कर्मचारी व अधिकारी पदावर येण्यासाठी एकूण चार परिक्षांचे पर्याय उपलब्ध असल्याचे पाटील यांनी एका बालपत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. हे चार पर्याय स्पष्ट करुन सांगताना ते म्हणाले, पोलीस कर्मचारी,पोलीस उप निरिक्षक (पीएसआय), उप विभागीय पोलीस अधिकारी(डी. वाय. एस. पी) आणि भारतीय पोलीस सेवा(आय. पी. एस) असे हे पर्याय आहेत. बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलास वा मुलीस पोलीस भरती प्रक्रीया (लेखी परिक्षा व मैदा़नी खेळ चाचणी) पूर्ण करुन ‘पोलीस कॉन्स्टेबल’या पदावर रुजू होता येते. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारास महाराष्ट्र पब्लिक सर्व्हीस कमीशन(एमपीएससी)ची परीक्षा उत्तीर्ण होवून पुढील प्रशिक्षणा नंतर पोलीस उप निरिक्षक (पीएसआय)या पदावर रुजू होता येते. खात्यात आल्यावर चांगली सेवा बजावत पदोन्नतीद्वारे उप विभागीय पोलीस अधिकारी(डी. वाय. एस. पी) या पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. उप विभागीय पोलीस अधिकारी(डी. वाय. एस. पी) आणि भारतीय पोलीस सेवा(आय. पी. एस) या दोन्ही करिता किमान शैक्षणीक पात्रता पदवी उत्तीर्णतेची आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्याकरिता संयमाची गरज-सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेकरिता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस दल आहे. परंतु काही वेळेस आंदोलने वा मोर्चे या निमित्ताने संतप्त होणाºया जमावाला नियंत्रणात आणण्याकरिता अत्यंत संयमाने पोलिसांना कार्यवाही करावी लागते असे एका प्रश्नाच्या उत्तरात पाटील यांनी सांगितले. या कार्यवाहीचे स्वरुप स्पष्ट करताना ते म्हणाले, संतप्त जमावाला पांगवण्यासाठी प्रथम अश्रुधूर, मग लाठीचार्ज, त्यानंतर वॉटरगन यांचा वापर केला जातो. तरीही जमाव नियंत्रणाखाली आला नाही तर सरते शेवटी पूर्वसूचना देवून हवेत गोळीबार करण्यात येतो. तरीही जमाव पांगला नाही, शांत झाला नाही तर पूर्वसूचना देवून सरते शेवटी कमरेच्या खाली गोळीबार करणे अशा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो.पासपोर्ट इन्कॉयरी विनाविलंब आणि आॅनलाइन-पासपोर्ट अर्थात पारपत्राकरिता आवश्यक पोलीस चौकशी आता विनाविलंब आणि आॅनलाइन होत असल्याची माहिती या विभागाचे सहा.पोलीस निरिक्षक प्रकाश निकम यांनी दिली. महिला पोलीस कॉन्स्टेबल मानसी पाटील व सुचिता पाटील यांनी दौºयावर येणाºया विशेष नागरिकांचे पदाधिकाºयांचे बंदोबस्त पासपोर्ट, आणि व्हीसा या संदर्भात चालणाºया कामाची माहिती दिली. चारित्र्य पडताळणी करुन प्राप्त होणाºया पोलीस दाखल्याची प्रक्रिया व उपयोग या बाबतची माहिती पोलीस कॉन्स्टेबल अभिनव मगर यांच्याकडून प्राप्त केली.महाराष्ट्र पोलीस सायबर (सेल)रायगड पोलीस सायबर सेलचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक आर.एस. स्वामी यांच्याकडून इंटरनेटच्या माध्यमातून होणाºया गुन्ह्यासंदर्भात माहिती घेतली. ‘ब्लू व्हेल गेम’ या आता घडणाºया सायबर क्राइमबद्दल माहिती व त्यासाठी घ्याव्या लागणाºया दक्षता या संदर्भात त्यांनी माहिती दिली.आय.एम.इ.आय. नंबर प्रत्येक मोबाईलसाठी स्वतंत्र दिला असतो. त्यामुळे मोबाईल ट्रॅक करणे सोपे जाते. सायबर क्राइमचे आपण बळी ठरु नये याकरिता, आपला आधार नंबर, पॅनकार्ड नंबर, बँक खाते क्रमांक कोणालाही देवू नये.पोलीस होण्यासाठी बौध्दिक व शारीरिक क्षमतांसह जिद्द व चिकाटी आवश्यकपोलीस सेवेत दाखल होण्याकरिता या सर्व परीक्षांसाठी बौध्दिक व शारीरिक क्षमता असाव्या लागतात. तसेच जिद्द व चिकाटी ही असावी लागते. पोलीस क्षेत्रात आल्यावर प्रमोशन व त्यासाठी लागणाºया स्पर्धा परीक्षा यातून सुध्दा या पदावर पोहोचता येते. क्रीडा क्षेत्रांतील अनन्य साधारण यश आणि योगदानातून देखील थेट पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती प्राप्त होवू शकते. कुस्तीपटू नरसिंग यादव याला अलीकडेच अशाच प्रकारे थेट अप्पर पोलीस अधीक्षक पदावर शासनाने नियुक्ती केल्याची आठवण त्यांनी करुन दिली.पोलीस नियंत्रण कक्षपोलीस विभागीताल संभाषण गुप्तता अबाधित राखण्याकरिता जरी ब्रिटिशकालीन वायलेस यंत्रणा वापरली जात असली तर अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा अनोखा वापर रायगड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात दिसून आला. जीपीएस यंत्रणेद्वारे पोलिसांच्या जिल्हाभरातील गाड्या ट्रॅक करता येतात. वायरलाइन यंत्रणेबरोबरच हॉटलाईन या माध्यमांद्वारे जिल्ह्यातील इतर पोलस स्टेशनच्या संपर्कात राहता येते. गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी या कक्षाच्या खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. हॉटलाईन सेवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे खंडीत होत नाही. यासाठी विशिष्ट टोल फ्री क्र. दिलेले असतात. उदा. (मुंबई ८११) अशी माहिती नियंत्रण कक्षातून प्राप्त झाली.
पोलीस वापरतात ब्रिटिशकालीन यंत्रणा, बालपत्रकारांनी घेतली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 2:09 AM