पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय बॅनर्स, झेंडे हटवले

By वैभव गायकर | Published: March 17, 2024 05:18 PM2024-03-17T17:18:29+5:302024-03-17T17:19:18+5:30

आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी याबाबत 17 रोजी रविवारी शहरात पाहणी करून उर्वरित बॅनर्स हटविण्याच्या सुचना अतिक्रमण विभागाला केल्या.

Political banners, flags removed from Panvel Municipal Corporation area | पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय बॅनर्स, झेंडे हटवले

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय बॅनर्स, झेंडे हटवले

पनवेल - लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 16 रोजी दुपारपासुन लागू करण्यात आल्याने पनवेल महानगरपालिका एक्शन मोडवर आली आहे. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पालिकेने राजकीय बॅनर्स, झेंडे, फ्लेक्स हटविण्यास सुरुवात केली आहे.आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी याबाबत 17 रोजी रविवारी शहरात पाहणी करून उर्वरित बॅनर्स हटविण्याच्या सुचना अतिक्रमण विभागाला केल्या.

आयुक्त गणेश देशमुख यांच्यासमवेत यावेळी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड,उपायुक्त डॉ. वैभव विधाते आदींसह प्रत्येक प्रभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. शनिवारी रात्रीपासून पालिका प्रशासनाने 4500 झेंडे,3200 छोटे मोठे बॅनर्स, 2500 कटआऊट्स पालिका प्रशासनाने हटवले आहेत. दरम्यान राजकीय पक्षांना देखील आयुक्त गणेश देशमुख यांनी देखील राजकीय पक्षांना अवाहन  करीत आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत. राजकीय पक्षांनी रंगवलेल्या भिंती देखील व्हॉश करन्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच आचारसंहितेचे उल्लघंन केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.

Web Title: Political banners, flags removed from Panvel Municipal Corporation area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.