पाली : सुधागड तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी आपले राजीनामे दिल्याने सुधागडातील शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.यामध्ये सेनेचे सुधागड तालुका संपर्क प्रमुख विनेश सितापराव, संघटक नीलेश अवसरे, उपतालुकाप्रमुख सचिन जवके, विभाग प्रमुख कृष्णा दिघे, उपविभाग प्रमुख सदानंद भोईर, अजय देशमुख, शहर प्रमुख प्रदीप गोळे आदी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याकडे दिल्याने हे नाराज पदाधिकारी मग कोणत्या पक्षात जाणार? अशा उलटसुलट चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे.मात्र, या पदाधिकाºयांनी गेली काही महिन्यांपासून सुधागड तालुका शिवसेनेमध्ये मरगळ आलेली आहे. शिवसेनेचा भगवा सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रभर झाला पण सुधागड तालुक्यात झाला नाही, तसेच तालुक्यातील वरिष्ठ शिवसेना पदाधिकाºयांनी व नेतेमंडळींनी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाºयांची कुठल्याही संघटनात्मक कामाबद्दलची बैठक गेली अनेक महिने लावली नाही. यामुळे हे राजीनामे दिल्याचे शिवसैनिक खासगीमध्ये बोलत आहेत.या सर्व बाबींचा विचार करून आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत व आमच्या पदाला न्याय देऊ शकत नसल्याने आम्ही राजीनामे देत असल्याचे कारण या पदाधिकाºयांनी दिले आहेत.खासदारकीच्या निवडणुकीनंतर सुधागड तालुक्यातील शिवसेना कोणतेही उपक्रम राबविताना दिसत नाही यामुळे नाराजी आहे.पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमखासदारकीच्या निवडणुकीनंतर सुधागड तालुक्यातील शिवसेना कोणतेही उपक्रम राबविताना दिसत नाही. शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष यांनी पुढे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षाकडून मात्र काहीच हालचाली होताना दिसत नाही त्यामुळे या दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याने काही पदाधिकाºयांना कोणता झेंडा घेऊ हाती असे बोलण्याची वेळ आली आहे.
शिवसेनेत राजकीय भूकंप, सुधागडमध्ये चर्चांना उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 2:36 AM