ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:48 AM2018-05-08T06:48:48+5:302018-05-08T06:48:48+5:30
तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या १५७ जागांसाठी सार्वत्रिक, तर दोन ग्रामपंचायतींच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी २७ मे रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरु वात झाली आहे.
अलिबाग : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या १५७ जागांसाठी सार्वत्रिक, तर दोन ग्रामपंचायतींच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी २७ मे रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरु वात झाली आहे.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
आदर्श आचारसंहिता, मतदार यादी, मतदान यंत्रे, मतदार संख्या यासह अन्य बाबीची माहिती विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीद्वारे देण्यात आल्याचे अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ यांनी सांगितले.
अलिबाग तालुक्यातील आवास ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी निवडणूक प्रक्रि या पार पडणार आहे. त्याचप्रमाणे वाडगाव- ७ जागा, शहाबाज-११, किहीम-११, मिळकत खार-७, पेढांबे-९, माणकुळे-९ वाघ्रण-७, चिंचवली-११, खंडाळे-१३, कामार्ले-९, खिडकी-७, नागाव-१५, खानाव-१३, रेवदंडा ग्रामपंचायतीमध्ये १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
सातिर्जे ग्रामपंचायतीमधील एक, तर रामराज ग्रामपंचायतीमधील दोन जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रि या राबवण्यात येत असल्याची माहिती सकपाळ यांनी दिली.
२७ मे रोजी होणाºया निवडणुकीत तब्बल ४७ हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत.
निवडणुकीतून सरपंच थेट निवडला जाणार आहे. आवास, शहाबाज, मिळकतखार, माणकुळे, कामार्ले, नागाव या सहा जागा सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंचपदासाठी आरक्षित आहेत, तर सर्वसाधारण महिलांसाठी वाडगाव, वाघ्रण, चिंचवली, खिडकी, खानाव या पाच आणि अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी किहीम, खंडाळे, रेवदंडा या तीन जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गातील उमेदवार पेढांबे ग्रामपंचायतीसाठी निवडून द्यायचा आहे. निवडणुकीच्या प्रचाराला ग्रामीण भागांमध्ये चांगलीच रंगत वाढत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर राष्टÑवादी, शिवसेनेची राजकीय गणिते अवलंबून असल्याने सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी आपली ताकद पणाला लावली
आहे.