राजकारणात रंगलय कुटुंब, प्रचारात उतरलेय अवघे सुनील तटकरे यांचे कुटुंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:26 AM2019-04-06T02:26:41+5:302019-04-06T02:27:10+5:30
राजकीय आखाडा : जिंकण्यासाठी सारेच करत आहेत मेहनत
जयंत धुळप
अलिबाग : लोकसभा निवडणुकांसाठी रायगड मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच कमी असल्याचे चित्र आहे. २६ उमेदवारांपैकी २१ उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही, तर चार जणच पदवीधारक आहेत. पदवीधर उमेदवारांव्यतिरिक्त इयत्ता दुसरी पास ते बारावी पास अशी शैक्षणिक पात्रता उमेदवारांची आहे. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र, लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येही पदवीधरांचे प्रमाण कमीच आहे. राजकीय पक्षांकडून उच्चशिक्षित उभे नाहीच.
सुनील तटकरे । राष्ट्रवादी काँग्रेस
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून कारकिर्दीस प्रारंभ. आमदार, दोन वेळी मंत्री, रायगडचे पालकमंत्री अशा पदांच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे सक्रिय राजकारणात प्रभावीपणे कार्यरत. मोठा जनसंपर्क.
पत्नी । वरदा सुनील तटकरे
सक्रिय राजकारणात नसल्या तरी घर सांभाळून पक्ष संघटनात्मक आणि विशेषत: महिलांशी निगडित उपक्रमात सतत कार्यरत. गेल्या ३० वर्षांत कोणतेही पद त्यांनी भूषविलेले नाही.
मुलगा । आमदार अनिकेत तटकरे
कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार म्हणून कोकणात सक्रिय कार्यरत. विद्यमान निवडणुकीत आपल्या वडिलांच्या प्रचारार्थ स्वतंत्रपणे सभा-बैठकांमध्ये व्यस्त. कार्यकर्त्यांचा समन्वय ते ठेवतात.
मुलगी । अदिती सुनील तटकरे
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत. गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय राजकारणात युवा कार्यकर्ती म्हणून कार्यरत. विद्यमान निवडणुकीत आपल्या वडिलांच्या प्रचाराचे नियोजन त्या पाहतात.
व्याही । संतोष पोटफोडे
सुनील तटकरे यांचे व्याही आणि रोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे हे रोहा शहर व परिसरातून मताधिक्य मिळवून देण्याकरिता सक्रिय कार्यरत आहेत. विविध बैठकांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार सुरू आहे.