शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

रायगडमध्ये मतदानानंतर राजकीय चर्चांना आले उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:58 PM

आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्येच सरळ लढत झाल्याने कोणता उमेदवार निवडून येणार याबाबत सर्वत्रच उत्सुकता लागली आहे.

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये २३ एप्रिल रोजी निवडणूक पार पडली. ६१.७७ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्येच सरळ लढत झाल्याने कोणता उमेदवार निवडून येणार याबाबत सर्वत्रच उत्सुकता लागली आहे. चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये तटकरे आणि गीतेंच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू असल्याचे दिसून येते. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने पुढचा एक महिना अशाच राजकीय चर्चांना चांगलेच उधाण येणार आहे.गेले महिनाभर निवडणूक प्रचाराचा धुरळा शहरी भागापासून ग्रामीण भागामध्ये चांगलाच अनुभवायला मिळाला होता. निवडणुका मंगळवारी पार पडल्यानंतर राजकीय वातावरण शांत होईल असे वाटत होते. मात्र, आता कोणता उमेदवार निवडून येणार या विषयावरच चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. चर्चा करणाऱ्यांनी कोणाच्या बाजूने निकाल लागणार हेही जाहीर केले आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीमधील नेत्यांची, उमेदवारांची चांगलीच धाकधूक वाढण्याची शक्यता आहे.आघाडीमध्ये शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापची ताकद आहे. तटकरे यांची मदार खºया अर्थाने अलिबाग विधानसभा मतदारसंघावरच आहे. याच मतदारसंघातून त्यांना मताधिक्क मिळेल, असा आघाडीतील प्रमुखांचा अंदाज आहे. या विभागात ते जास्तीत जास्त मताधिक्य घेतील त्यावरच त्यांच्या विजयाचे समीकरण सुटणार आहे. गीते यांना या मतदारसंघात फारसे यश मिळेल असे दिसून येत नसले तरी, शेकाप आणि काँग्रेस एकत्र आल्याचा विपरीत परिणाम आघाडीवर होऊन त्याचा फायदा गीतेंना मिळेल असाही एक मतप्रवाह आहे.पेण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकाप भक्कम आहे. मात्र, माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. येथे ही शेकाप-काँग्रेस एकत्र आल्याचा बरा-वाईट परिणाम होणार आहे. या मतदारसंघातील चर्चांत शहरी भागासह ग्रामीण भागात गीतेंना सरस ठरवण्यात आले आहे.महाड विधानसभा मतदारसंघात तर याहीपेक्षा मोठमोठ्या चर्चा ऐकाला मिळत आहेत. आमदार भरत गोगावले हे एकटे आघाडीवर भारी पडणार आहेत. येथून गीतेंना मताधिक्क मिळेल अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे गीतेंसाठी ही जमेची बाजू ठरणार असल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांच्या काँग्रेसने किती काम केले आहे ते मतपेटी उघडल्यावरच समोर येईल, अशीही चर्चा काँग्रेसच्या बाजून होताना दिसते.श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात तटकरे यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत, त्यामुळे तटकरे यांना या विभागातून मताधिक्क मिळेल अशी चर्चा होत आहे. येथील शिवसेनेच्या गोटातून तटकरे यांच्यावर धनुष्यबाण भारी पडेल, असेही बोलले जात आहे.दापोली आणि गुहागर मतदारसंघामध्ये कुणबी, मराठा मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी हा फॅक्टर दापोलीमध्ये गीतेंच्या बाजूने तर गुहागरमध्ये तटकरेंच्या बाजूने उभा राहणार असल्याची धडाकेबाज चर्चा आहे.दरम्यान, मतदारांनी कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकले आहे हे २३ मे रोजी होणाºया मतमोजणीनंतरच खºया अर्थाने स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळेल. तोपर्यंत रोज नवीन राजकीय चर्चा ऐकायला मिळणार आहेत एवढे मात्र निश्चित आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019sunil tatkareसुनील तटकरेraigad-pcरायगडAnant Geeteअनंत गीते