शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज, प्रतिष्ठा पणाला : खारसई ग्रामपंचायतीची निवडणूक होणार चुरशीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 3:22 AM

तालुक्यातील मोठी व सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची खरसई ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असून गेली दहा वर्षे असलेली बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होणार असल्याचे स्पष्ट संकेत

म्हसळा : तालुक्यातील मोठी व सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची खरसई ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असून गेली दहा वर्षे असलेली बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होणार असल्याचे स्पष्ट संकेत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिले आहेत. पहिल्यांदाच सरपंच थेट निवडणूक होत असल्याने सरपंच पदासह संपूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.खरसई ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य संख्या असून प्रभाग १ मध्ये सर्वसाधारण खुला १ व सर्वसाधारण महिला ३, प्रभाग क्र. २ मध्ये सर्वसाधारण खुला १, सर्वसाधारण महिला १, नामप्र महिला १, प्रभाग क्र. ३ मध्ये सर्वसाधारण खुला १, नामप्र पुरु ष १, अनुसूचित जमाती महिला १ अशा प्रकारे आरक्षण आहे. सरपंच पदासाठी अनेक नावे चर्चेत असली तरी शेकापकडून विद्यमान सरपंच नीलेश मांदाडकर, शिवसेनेकडून कानू शितकर, नरेश कातळकर, भाजपकडून चंद्रकांत खोत तर खरसई ग्रामविकास आघाडीतर्फे हरिश पयेर यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. गावचा विकास या मुद्यावर निवडणुका होणार असून गावातील पाणीपुरवठा योजना, दिवाबत्ती, सोयी सुविधा, अंतर्गत रस्ते आदी विषय सर्वच पक्षांच्या पटलावर राहतील. सध्या पंचायतीत शेकाप राष्ट्रवादी आघाडीचा सरपंच असून शिवसेनेचा उपसरपंच आहे. शेकाप राष्ट्रवादी सोबत शिवसेना विद्यमान पंचायतीत सत्ताधारी असल्याने आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्येक पक्ष स्वत:ची भूमिका मतदारांसमोर ठेवतील. शेकाप राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, भाजपा, काँग्रेस सोबत ग्रामविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने निवडणूक चुरशीची होईल असे राजकीय विश्लेषकांचेमत आहे.माणगाव तालुक्यात १९ग्रामपंचायतींच्या निवडणुकालोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७ हजार ५७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या असून या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून त्यापैकी माणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १४ आॅक्टोबर रोजी होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.माणगाव तालुक्यातील साई, गोरेगांव, करंबेळी, कुमशेत, न्हावे, पहेल, भागाड, मांगरु ल, मुठवली तर्फे तळे, डोंगरोली, शिरवली तर्फे निजामपूर,हरकोल, होडगांव, दहिवली कोंड, पळसप, चिंचवली, टोळखुर्द, नांदवी, कुंभे या १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यातील १२ ग्रामपंचायती स्त्री वर्गासाठी आरक्षित आहेत तर ७ ग्रामपंचायतीत सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच निवडण्यात येणार आहेत. यामध्ये करंबेळी (नामप्र स्त्री), चिंचवली (नामप्र स्त्री), कुंभे (नामप्र स्त्री), नांदवी (नामप्र स्त्री), तर भागाड व पहेळ, ग्रामपंचायत नामप्र खुल्या जागेसाठी आरक्षित आहेत. शिरवली तर्फे निजामपूर व होडगांव या ग्रामपंचायती अ.ज. स्त्रीसाठी राखीव आहेत. दहिवलीकोंड, डोंगरोली, कुमशेत, न्हावे, पळसप, मुठवली तर्फे तळे या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव असून गोरेगांव, हरकोल, साई, मांगरु ळ व टोळखुर्द या ग्रामपंचायती सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. या निवडणुकांत सरपंच पदासाठी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीतून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. सरपंच पदाचे उमेदवार असलेली व्यक्ती १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास तो उमेदवार किमान ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.मुरूडमध्येही मोर्चेबांधणीला सुरु वातलोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : मुरु ड तालुक्यातील काकळघर, तेलवडे, कोर्लई, वेळास्ते, वावडुंगी या ग्रामपंचायत हद्दीत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अवघ्या एका महिन्यावर ही निवडणूक येऊन ठेपली असल्याने इच्छुक उमेदवारासंह सर्वच पक्षांची उमेदवारांच्या बाबतीत दमछाक होताना दिसत आहे. ग्रामपंचायतीवर आपलाच झेंडा फडकावा यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक तालुकास्तरावरील तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांबरोबर गुप्त चर्चा बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक स्थानिक कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक गावात नाक्या नाक्यावर गावच्या निवडणुकीवर तासन्तास चर्चा होताना दिसत आहेत. सरपंच पद हे थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्याने ग्रामपंचायतीमधील स्पर्धकांमध्ये वाढ झाली आहे. मुरु ड -तेलवडे, कोर्लेई ग्रामपंचायतींवर सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे तर मुरु ड -वावडुंगी, वेळास्ते, काकळघर या ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. आता थेट सरपंच निवडणूक असल्याने यावेळी या पंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार यावर साºयांचे लक्ष लागून असणार आहे.