कारखान्यांना प्रदूषण मंडळाची नोटीस
By admin | Published: December 23, 2016 03:23 AM2016-12-23T03:23:55+5:302016-12-23T03:23:55+5:30
प्रदूषण नियंत्रण कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून, महाड औद्योगिक क्षेत्रातील लासा लॅबोरेटरीज लिमिटेड आणि सुदर्शन
महाड : प्रदूषण नियंत्रण कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून, महाड औद्योगिक क्षेत्रातील लासा लॅबोरेटरीज लिमिटेड आणि सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज या दोन कारखान्यांना प्रदूषण मंडळाने नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांनंतर या कारखान्यांनी आपल्या कारखान्यात प्रदूषणाबाबत सुधारणा केली नाही, तर कारखाना बंद करण्याचा इशारा प्रदूषण मंडळाने दिला आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांकडून उघड्यावर घनकचरा, तसेच प्रक्रिया न करताच सांडपाणी कारखान्यांबाहेर सोडण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात. याबाबत नागरिकांनी प्रदूषण मंडळाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेऊन महाड येथील उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी या दोन कारखाना व्यवस्थापनाला अंतरिम नोटीस बजावली आहे. त्यात संबंधित कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.