शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

समस्यांमुळे माणगावकर हैराण, सांडपाण्यामुळे काळनदी होतेय प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 3:01 AM

नगरपंचायतीस तीन वर्षे पूर्ण होत असताना नगरपंचायतीपुढे कचऱ्याचा मोठा यक्षप्रश्न उभा आहे. योग्य डम्पिंग ग्राउंड नसल्याने कच-याची विल्हेवाट लावता येत नाही, तसेच माणगाव शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने मानवी वस्ती वाढत आहे.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव  - नगरपंचायतीस तीन वर्षे पूर्ण होत असताना नगरपंचायतीपुढे कचऱ्याचा मोठा यक्षप्रश्न उभा आहे. योग्य डम्पिंग ग्राउंड नसल्याने कच-याची विल्हेवाट लावता येत नाही, तसेच माणगाव शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने मानवी वस्ती वाढत आहे. त्यामुळे सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्याने काळ नदी लागत असणाºया वस्तीचे सांडपाणी नदीपात्रात जावून प्रदूषण वाढत आहे.माणगाव नगरपंचायत झाली त्यामध्ये खादाड, नाणोरे, उतेखोल ही माणगाव लागत असणारी गावे जोडली गेली. आता नगरपंचायत झाल्यामुळे माणगावच्या विकासाला आता गती येईल, असे माणगावकरांना वाटले होते; परंतु असे काहीही झालेले नाही. ज्या प्राथमिक समस्या माणगावमध्ये होत्या त्या तशाच गेल्या दोन वर्षे राहिल्या. गेल्या वर्षात माणगावमध्ये प्रमुख रस्ता मानला जाणारा कचेरी रोड, दुतर्फा काँक्रीट गटारे महामार्गावरील काँक्रीट गटारे, वैयक्तिक शौचालये, गणपती विसर्जन घाट हे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागले असून, अंतर्गत रस्त्यांची कामे व गटारे अजून शिल्लक आहेत. जुन्या माणगावमध्ये पाण्याची अनियमितता आहे. पाणी वेळेवर येत नाही आणि आले तरी कधी जास्त वेळ असते तर कधी अतिशय कमी वेळ, त्यामुळे नागरिकांचे हाल होतात.ग्रामपंचायत कालखंडामध्ये अनधिकृत बांधकामांना दिलेल्या संमतीमुळे आज सांडपाण्याची समस्या भेडसावत आहे. ग्रामपंचायत कालावधीत सदनिकांना सांडपाण्याचे नियोजन नसताना सदनिका काळ नदीकिनारी बांधल्या गेल्या, त्यामुळे सांडपाणी जाण्यास मार्ग नसल्याने पाणी नदीत जात आहे. यावर मार्ग काढण्यास नगरपंचायत माणगावची कसोटी लागणार आहे.माणगावमधील अनेक निवासी संकुल गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट काळनदीत सोडले आहे. या काळनदीचे पाणी शहरातील ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे गावांतील नागरिकांना पुरविले जाते. सद्यपरिस्थितीत हे पाणी अत्यंत दूषित झाले असून, साथीचे अनेक रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. याच नदीवर पुढे गोरेगावचे धरण आहे. या सर्व गोष्टींकडे नगरपंचायत पूर्णपणे डोळेझाक करीत आहे.कचरा उचलण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, कचºयावर तांत्रिकदृष्ट्या विघटन करण्यासाठी डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था दत्तनगर येथे लवकरच करण्यात येणार असून त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने घेऊन हा कचराप्रश्न काही दिवसांतच मार्गी लागणार आहे.- योगिता चव्हाण,नगराध्यक्षा, माणगाव नगरपंचायतमाणगाव शहरात झपाट्याने शहरीकरण होत आहे, यामुळे सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता भूमिगत गटारांचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. माणगाव शहरातील अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत, यात मुख्य कचेरी रस्ता, शहरातील मुख्य गटारांचे काँक्र ीटीकरण, अंतर्गत रस्ते झाले असून कालवा रोडचे नूतनीकरण, पाण्याच्या नवीन टाक्या ही मंजूर कामे चालू होणार आहेत, तरी माणगाव शहर विकासकामात कात टाकत चालले आहे.- समीर जाधव,मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपंचायत माणगाव

टॅग्स :Raigadरायगड