विठूच्या गजरात दुमदुमली नगरी
By admin | Published: July 16, 2016 02:05 AM2016-07-16T02:05:25+5:302016-07-16T02:05:25+5:30
अलिबाग : आषाढी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ विठ्ठल मंदिरांत शुक्रवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.
अलिबाग : आषाढी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ विठ्ठल मंदिरांत शुक्रवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. अलिबाग शहराजवळच्या वरसोली येथील प्राचीन आंग्रेकालीन विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अलिबाग तालुक्यातील विविध कोळीवाड्यांतील दिंड्या दर्शनाकरिता मंदिरात आल्या होत्या. दरम्यान, मंदिरात पहाटेपासूनच विविध भजन मंडळांनी आपली भजन सेवा रुजू केली. मंदिर विश्वस्त व संयोजन समितीच्या वतीने देखील भाविकांना दर्शनात कोणतीही असुविधा होवू नये याकरिता चांगले नियोजन केले होते. पावसापासून संरक्षण करण्याकरिता तात्पुरत्या शेडची उभारणी करण्यात आली होती. प्रसादाची देखील व्यवस्था ठेवण्यात आली होती. वरसोलीमधील इंडियन एज्युकेशन सोयायटीच्या विद्यार्थी बालगोपाळांची दिंडी काढण्यात आली होती.
च्नागोठणे : शहरात मोठ्या उत्साहासह धार्मिक वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठल - रखुमाई मंदिरात पहाटे पूजा झाल्यावर धार्मिक कार्यक्र मांना सुरुवात झाली. भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार शाळेच्या विद्यार्थ्यांची विठ्ठल,रखुमाई, संत तुकाराम यांच्या वेशभूषेसह बाल वारकऱ्यांची भजनाच्या गजरात शिवाजी चौकापासून पालखीसह दिंडी काढण्यात आली.
1आगरदांडा : मुरुड तालुक्यातील जुनी पेठ परिसरात असणारे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुमारे १७५ वर्षे असणारे प्राचीन मंदिर याठिकाणी आहे. जुनी पेठ भागात अठरापगड जातीचे लोक एकत्र येवून एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करतात.पहाटे काकड आरती व महापूजा झाल्यानंतर मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात येते.2वर्षभरातील २४ एकादशांमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व असून सर्व भक्त विठोबा मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. त्यामुळे संपूर्ण मुरुड तालुक्यात भक्तीचे वातावरण पसरलेले असते. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. त्यामुळे प्रत्येकजण या दिवशी व्रत करीत असतात.3एकात्मिक बाल विकास सेवा योजना लक्ष्मीखार अंगणवाडी क्र. ३३ या मुलांनी आषाढी एकादशीनिमित्त लहान मुलांनी टाळ व डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठलाच्या नामाचा गजर करत दिंडी काढण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका आरती शेंडगे, संगीता म्हात्रे उपस्थित होते.