शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

डहाणूतील गोरगरिबांची राॅकेलसाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 11:46 PM

तीव्र टंचाई : स्वयंपाक, दिवाबत्तीसाठी डिझेलचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : डहाणू तालुक्यातील गावखेडोपाड्यांत गेल्या वर्षभरापासून रॉकेलची तीव्र टंचाई निर्माण झाली असून स्वयंपाक, दिवाबत्तीसाठी लागणाऱ्या रॉकेलसाठी वणवण भटकावे लागत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत उज्ज्वला गॅस योजना आणली खरी, मात्र नवे गॅस सिलिंडर आणण्यासाठी आदिवासींकडे पैसे नसल्याने उज्ज्वला गॅस योजनेच्या शेगडी आणि सिलिंडर अनेकांच्या घरांत शोभेच्या बाहुल्या ठरल्या आहेत.पाच लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात ६० टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकवस्ती आहे. तर, तालुक्यात मोठ्या प्रमाणातील कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असताना जिल्हा पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे वर्षभरापासून रॉकेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. डहाणूत ८५ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. तर, ३२६ किरकोळ रॉकेल विक्रेते आहे. सन २०१९ ला डहाणू तालुक्याला जिल्हा पुरवठा विभागाकडून १३ टँकर रॉकेलपुरवठा केला जात होता. परंतु, वर्षभरात रॉकेलचा पुरवठा वाढण्याऐवजी प्रचंड कपात करण्यात आली. तब्बल एक लाख लीटर रॉकेल कपात झाल्याने गोरगरिबांना रॉकेलसाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.सध्या डहाणू तालुक्याला केवळ ४८ हजार लीटर पुरवठा केला जात असल्याने आदिवासींना डोक्यावर लाकूडफाटीची मोळी उचलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील बहुसंख्य गावात आजही स्वयंपाकासाठी स्टोव्हचा वापर केला जातो. परंतु, गॅस कनेक्शनधारकांना अनुदानित रॉकेल न देण्याचे शासनाचे आदेश असल्याने त्यांना पेट्रोलपंपावरून इंधन आणावे लागत आहे. तर, डहाणूच्या दुर्गम भागात पहाटे अंघोळीचे पाणी तापविणे, चूल पेटविणे, संध्याकाळी दिवाबत्तीसाठी रॉकेलची गरज लागते. परंतु, या गोरगरीब आदिवासींच्या रेशनकार्डावर उज्ज्वला गॅस कनेक्शनचा शिक्का असल्याने त्यांना रॉकेल दिले जात नाही. तर डहाणूच्या अतिदुर्गम भागातील दाभाडी, दिवशी, गांगुर्डे, दाभोण, खुबाले, गडचिंचले इत्यादी ठिकाणच्या आदिवासींकडे आजही रेशनकार्ड नसल्याने त्यांना रेशनिंग दुकानातील धान्य किंवा रॉकेल मिळत नाही.

किरकोळ रॉकेल विक्री करणाऱ्या लायसन्सधारकांना गॅस कनेक्शन नसलेल्या शिधापत्रिका लाभार्थ्यांकडून हमीपत्र घेण्यासाठी अनेक वेळा सूचना केली आहे.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू