भाताच्या रोपवाटिकांना प्रतीक्षा दमदार पावसाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:35 AM2019-06-19T00:35:58+5:302019-06-19T00:36:05+5:30

रोपे करपण्याची भीती; पेणमधील शेतकरी चिंताग्रस्त

Poor rains wait for the waiters | भाताच्या रोपवाटिकांना प्रतीक्षा दमदार पावसाची

भाताच्या रोपवाटिकांना प्रतीक्षा दमदार पावसाची

googlenewsNext

पेण : जून महिना निम्म्याहून अधिक संपला तरी मान्सून सक्रिय झालेला नाही. पूर्व मोसमी पावसाच्या हलक्या सरी पडून अंकुरलेल्या भात रोपांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसा पडणाऱ्या कडक उन्हात पाण्याअभावी या रोपवाटिकामधील रोपे करपण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

पेणमधील खारभूमी क्षेत्रात ६५७८ हेक्टर क्षेत्रावर ही समस्या उद्भवली आहे. या जमिनीत उगवण झालेल्या नर्सरी रोपांची अवस्था पाण्याअभावी गंभीर बनली आहे. सतत पावसात रोपे टिकाव धरतात, असे असताना मान्सून लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पेणमध्ये लागोपाठ तीन-चार दिवस पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने धूळपेरणी केलेले भाताला अंकुर फुटले आहेत. उबदार तापलेल्या जमिनीत पावसाच्या सरींचा शिडकाव होताच ही रोपे उगवतात. मात्र, त्यानंतरही पाऊस गायब झाला आणि कडक उन्हाचा सामना रोपांना करावा लागत आहे. सध्या अधूनमधून एखादी सर पडते, तेवढ्या आधारावर ही रोपे तग धरून उभी आहेत. येत्या दोन दिवसांत पाऊस सुरू न झाल्यास परिस्थिती गंभीर होऊन शेतकºयांना पीक तुटवड्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
पेणमधील १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर भात रोपलागवड झाली आहे. सर्व क्षेत्रात चांगली रोपे उगवली असून दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात जादा पैसे मोजून बी-बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे मान्सून अधिक काळ लांबल्यास शेती व शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.

Web Title: Poor rains wait for the waiters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस