प्रकाश आंबेडकर यांची जिल्हा प्रशासन, रिलायन्स व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 11:29 PM2021-11-18T23:29:07+5:302021-11-18T23:29:18+5:30

मागील इतिवृत्तानुसार रिलायन्स प्रशासनाने  देखील 206 प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे मान्य केले.

Positive discussion of Prakash Ambedkar with district administration, Reliance management | प्रकाश आंबेडकर यांची जिल्हा प्रशासन, रिलायन्स व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा

प्रकाश आंबेडकर यांची जिल्हा प्रशासन, रिलायन्स व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा

Next

रायगड : रिलायन्स प्रकल्पग्रस्त आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेली बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी दिली. जिल्हाधिकारी हे व्यवस्थापनांशी बोलून 15 दिवसात प्रस्ताव मागवणार आहेत. 15 दिवसांनी पुन्हा बैठक बोलवली जाईल. चांगला निर्णय होईल अशी अपेक्षा देखील अ‍ॅड आंबेडकर यांनी व्यक्त केली.

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स नागोठणे स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत आज अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी तसेच रिलायन्स कंपनीचे प्रशासन उपस्थित होते. बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मागील इतिवृत्तानुसार रिलायन्स प्रशासनाने  देखील 206 प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे मान्य केले. याबाबत 15 दिवसांत रिलायन्स व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्त आणि जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव तयार करुन त्याप्रमाणे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भात 15 दिवसांनी पुन्हा बैठक बोलवली जाणार असून तोपर्यंत जर सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर मात्र प्रकल्पग्रस्त आपले आंदोलन आणखी उग्र करतील असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या धरपकडीबाबत अ‍ॅड आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करुन आंदोलन होताना पोलिसांची ही भुमीका चुकीची असल्याचे सांगून त्यांनी लोकांशी व्यवस्थीत वागावे असे मत व्यक्त केले. तसेच आपण यासंदर्भात पोलिस अधिक्षकांशी बोललो असून यावेळी त्यांनी झालेल्या चुका दुरुस्त करु असे त्यांनी सांगितले.

Web Title: Positive discussion of Prakash Ambedkar with district administration, Reliance management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.