माथेरानच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 07:18 AM2017-12-01T07:18:03+5:302017-12-01T07:18:10+5:30
मागील काळातील अनेक विकासकामे अद्याप प्रलंबित असून, या रखडलेल्या कामांना सकारात्मकदृष्ट्या गती मिळावी, यासाठी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केवळ माथेरानच्या मूलभूत समस्या आगामी काळात पूर्णत्वास जायला हव्यात
- मुकुंद रांजणे
माथेरान : मागील काळातील अनेक विकासकामे अद्याप प्रलंबित असून, या रखडलेल्या कामांना सकारात्मकदृष्ट्या गती मिळावी, यासाठी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केवळ माथेरानच्या मूलभूत समस्या आगामी काळात पूर्णत्वास जायला हव्यात, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे विशेष बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केल्यानुसार बुधवारी तावडे यांच्या दालनात माथेरानच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करून सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी विविध महत्त्वपूर्ण प्रश्न या वेळी उपस्थित केल्यानंतर ते मार्गी लावण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे, नगरविकास राज्यमंत्री रणजितसिंग यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
सुट्ट्यांच्या हंगामात दस्तुरी नाका येथे गाड्यांच्या पार्किंगची जागा अपुºया प्रमाणात असल्याने वेळप्रसंगी गाड्या पार्क करता येत नाहीत, त्यामुळे पर्यटक माघारी जात असल्याने याचा एकंदरच येथील पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे. ही सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची समस्या असून, तातडीने सुटावी यासाठी दस्तुरी येथील रिक्त असलेला एम.पी. प्लॉट क्र .९३ या भूखंडाचे हस्तांतर प्रक्रि या अंतिम टप्प्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यामुळे पार्किंगची समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएमआरडीए माथेरानच्या दस्तुरी नाका ते पांडे प्ले ग्राउंडपर्यंतचा साडेपाच कि.मी.चा क्ले पेव्हर ब्लॉकचा रस्ता व चार पॉइंट्सचे सुशोभीकरण करणार आहे. या कामासाठी हरित लवादाकडे एफिडेव्हिट सादर करण्याचे निर्देश सनियंत्रण समितीने दिल्याने याबाबतची कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ अभियंता अरविंद ढाबे यांनी सांगितले. एमएमआरडीए १२३ कोटींची विकासकामे करणार आहे. सोंडेवाडी ते माथेरान व धोदाणी ते माथेरान या पर्यायी रस्त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे मंत्री रणजितसिंग पाटील यांनी एमएमआरडीएला सांगितले.
या वेळी नगरविकास राज्यमंत्री रणजितसिंगजी पाटील यांनीही माथेरानच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. या विशेष बैठकीला नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत, विशेष कार्यकारी अधिकारी चारु दत्त शिंदे, महसूल कक्ष अधिकारी प्रशांत वाघ आदी उपस्थित होते.
२६ जुलै २००५च्या अतिवृष्टीत घाट रस्त्यात भूस्खलन झाल्याने माथेरानचा जगाशी संपर्क तुटला होता. त्यामुळे पर्यायी रस्त्याची नितांत गरज असल्याचे नगरसेवक प्रसाद सावंत यांनी सांगितले. माथेरानच्या विविध विकासकामांंबाबतची विशेष बैठक नगरविकास राज्यमंत्री रणजितसिंग पाटील व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थित पार पडली.
पर्यायी मार्गाबाबत एमएमआरडीए यांनी माथेरानचा संपूर्ण भौगोलिक अभ्यास करून मार्ग जाणाºया जागा कुणाच्या अखत्यारित येत आहेत. वनविभागाच्या, महसूल खात्याकडे की नगरपालिकेच्या हद्दीत येत आहेत. याची सविस्तरपणे माहिती संकलित करून अहवाल सादर केल्यास राज्य शासन विचार करू शकेल.
- रणजितसिंग पाटील, नगरविकास राज्यमंत्री,
महाराष्ट्र
ई-रिक्षाचा प्रस्ताव लवकरच
माथेरानच्या हातरिक्षाचालकांना अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळावी, यासाठी पर्यावरण पूरक ई-रिक्षाचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नवी दिल्ली येथे पाठवण्यात येणार असल्याची ग्वाही पर्यावरण संचालक बी. एन. पाटील यांनी मंत्र्यांना दिली.
आजची बैठक हातरिक्षाचालकांसाठी ऐतिहासिक ठरल्याची
भावना श्रमिक हातरिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी व्यक्त
के ली.
ई-रिक्षामुळे रिक्षाचालकांना आरोग्यदायी व सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. माथेरानच्या अनधिकृत बांधकामाची केस पुण्याच्या हरित लवादाकडे सुरू आहे. नगरपालिकेने ४२८ बांधकामांची यादी लवादाकडे सादर केली आहे.
स्थानिक रहिवाशांनी या खटल्यात हस्तक्षेप करून बांधकामांचे पुन:निरीक्षण करण्याची मागणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.