शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

तीन वेळा भूमिपूजन, तरी नळपाणी योजना बासनात; म्हसळ्यात यंदाही पाणीटंचाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:26 PM

संघर्ष समिती ऐन हिवाळ्यात आंदोलनाच्या पवित्र्यात; टँकर पुरवठ्यातही घोळ

-उदय कळस म्हसळा : म्हसळा नगरपंचायत हद्दीत गेल्या चार-पाच वर्षांपासून मार्च ते जून या काळात भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवते. टंचाईवर मात करण्यासाठी नळ पाणी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे भूमिपूजनही एकदा, दोनदा नव्हे, तर तीन वेळा करण्यात आले. मात्र, त्यानंतर योजना कार्यान्वित करण्यात संबंधित प्रशासनाला अपयश आले आहे.

नळपाणी योजनेच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांकडून, अनावश्यक विंधण विहिरी खणून त्यातील दूषित पाण्याचा पुरवठा शहरातील बहुतांशी भागात केला गेला. त्यामुळे शहरात व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्यही बिघडले आहे.यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी मार्च ते जून या महिन्यांदरम्यान पाणीटंचाई होईल, असे अभ्यासपूर्ण विधान म्हसळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी म्हसळा नगराध्यक्ष निवडीनंतर घेतलेल्या पत्रकार भेटीदरम्यान केले. या वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा जयश्री कापर याही उपस्थित होत्या. गतवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी म्हसळा नगरपंचायतीने १६ लाख रुपये खर्च केल्याची माहितीही मुख्याधिकारी यांनी या वेळी दिली.

शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी म्हसळा पाणी संघर्ष समिती स्थापन करून गतवर्षी १० मे रोजी पाणीटंचाईबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ठोस उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले होते. याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला होता.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नळपाणी योजना कार्यान्वित करण्याऐवजी शहरात टँकरने पाणीपुरवठा केला गेला. त्यामध्ये मुख्याधिकारी यांचे अर्थपूर्ण राजकारण असल्याचे आरोप होत असून याच्या सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना शुद्ध, पुरेसे आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे निर्देश असल्याने ते पूर्ण करण्याच्या मागणीसाठी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष सुशील यांच्या नेतृत्त्वाखाली नागरिकांनी १४ मे २०१९ रोजी मोर्चाही काढला होता.

या वेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी नायब तहसीलदार के. टी. भिंगारे यांनी पुढील वर्षी पाणीटंचाई न होण्यासाठी म्हसळा नगरपंचायत सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, मुख्याधिकारी उकिरडे यांनी यंदाही पाणीटंचाईची शक्यता वर्तवल्याने ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी आंदोलनाचे संकेत पाणी संघर्ष समिती म्हसळाकडून मिळाले आहेत.

म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी केलेल्या विधानानुसार जर यंदाही पाणीटंचाई होणार असेल, तर पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांसमवेत चर्चा करून पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल.- सुशील यादव, अध्यक्ष पाणी संघर्ष समिती, म्हसळा

टॅग्स :water shortageपाणीकपातRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र