शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

माणगाव-चांदोरे रस्त्यावर जीवघेण्या खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 11:30 PM

म्हसळा-श्रीवर्धन-दिघी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीट चौपदरीकरणाचे काम मागील वर्षी चालू झाले आहे. काम अपुरे राहिल्याने माणगाव-मोर्बा-चांदोरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : म्हसळा-श्रीवर्धन-दिघी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीट चौपदरीकरणाचे काम मागील वर्षी चालू झाले आहे. काम अपुरे राहिल्याने माणगाव-मोर्बा-चांदोरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनचालकांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून रोज प्रवास करावा लागतो. त्यातच रस्त्याचे खड्डे बुजविण्यास वारंवार स्टोन क्रशर (ग्रिड)चा वापर करत असल्याने रस्त्यात चिखल होत असून, चिखल दुचाकीस्वार व पादचारी यांच्यावर उडण्याच्या घटना होत आहेत. तसेच दुचाकी गाडी घसरण्याच्या घटना घडत आहेत.या असंख्य खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासीवर्गाला अनेक प्रकारच्या अस्थी विकारांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर लोकांच्या वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. हे जीवघेणे भले मोठे खड्डे या महामार्गावरील संभाव्य अपघातांना आमंत्रण देणारे आहेत. संबंधित विभागाकडून खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरती वरवरची मलमपट्टी केली जाते; परंतु या मलमपट्टीचा काही उपयोग होत नाही. रस्त्यावरील धोका कायम राहात आहे.कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव आता तोंडावर येऊन ठेपला आहे. या उत्सवकाळात मुंबईतील सर्व चाकरमानी आपापल्या गावी येतात. रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या विभागातील बहुतांशी चाकरमानी नोकरी-धंद्यानिमित्ताने मुंबईत राहतात. हे सर्व चाकरमानी गणेशोत्सवाला आपापल्या गावी खासगी वाहनांनी आणि एसटी बसने येतात; पण सध्या माणगाव-मोर्बा ते म्हसळा-श्रीवर्धन महामार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडल्याने या महामार्गावरून प्रवास करणाºया वाहनांसह प्रवासी व सर्व गणेशभक्तांना या वर्षी या जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करावा लागणार असे चित्र आहे. विघ्नहर्ता श्री गणेशाचे देखील याच खड्डेयुक्त रस्त्यावरूनच आगमन होणार आहे.दरम्यानच्या काळात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रायगडचा दौरा केला. त्या वेळी ते म्हणाले, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वीच भरले जातील. त्यांच्या या आश्वासनाच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत या महामार्गावरील खड्डे आजही ठाण मांडून आहेत. गणेशभक्तांचे लक्ष हे रस्ते कधी खड्डेमुक्त होतात, याकडे लागून राहिले आहे.म्हसळा-श्रीवर्धन-दिघी रस्त्याचे काम करणाºया कत्राटदारानेच खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम करणे अपेक्षित आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून त्यास सक्त आदेश सत्वर निगर्मित होणे आवश्यक असल्याचे म्हणणे ग्रमस्थांचे आहे.

टॅग्स :Raigadरायगड