कुक्कुटपालकांनी बर्ड फ्लूबाबत काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:32 AM2021-01-14T00:32:36+5:302021-01-14T00:32:46+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन; अफवांवर विश्वास ठेवून भीती बाळगू नका

Poultry farmers should be careful about bird flu | कुक्कुटपालकांनी बर्ड फ्लूबाबत काळजी घ्यावी

कुक्कुटपालकांनी बर्ड फ्लूबाबत काळजी घ्यावी

Next

अलिबाग : सध्या बर्ड फ्लूबाबतची भीती सर्वत्र पसरलेली दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष्यांमधील बर्ड फ्लू या आजाराविषयीची योग्य ती माहिती समजून घेऊन त्याप्रमाणे काळजी घ्यावी, भीती बाळगू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. पक्ष्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात मर्तृक आढळल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना त्वरित कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के आणि जिल्हा पशुविकास अधिकारी डॉ. बंकट आर्ले यांनी नागरिकांना केले आहे.

पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचा इतर जंगली पक्ष्यांशी (उदा. बदके, कबुतर, पोपट, चिमण्या, कावळे इ.) संपर्क होणार नाही, याची दक्षता घेणे व जैवसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे, कुक्कुटपालकांनी शेड व परिसरामध्ये स्वच्छता बाळगणे, नियमित सोडियम हायपोक्लोराइड, धुण्याचा सोडा, चुना लावून परिसर निर्जंतुकीकरण करणे. प्रादुर्भाव झालेल्या फार्मवरून पक्ष्यांची वाहतूक, खरेदी-विक्री थांबवावी, असे सांगितले.

जिल्हा, विभागीय नियंत्रण कक्षाला कळवा

n पक्ष्यांच्या स्रावांसोबत तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा. पक्षी, कोंबड्याचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते, अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्ष्याला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला कळवा. 

n कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा. पूर्ण शिजवलेले मांसच खा. आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील, तर 
अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी
चिकन व अंडी १०० अंश डि.से.वर शिजवूनच खावीत, चिकन स्वच्छ करताना हॅण्ड ग्लोव्हजचा वापर करावा, समाजमाध्यमांतून व इतर प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अफवांपासून सावध राहावे. मांस, अंडी व मासे चांगले शिजवून बिनधास्त खा व निरोगी राहा तसेच अधिक माहितीसाठी www.ahd.maharahstra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

हे करू नका 
कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका. अर्धवट शिजलेले मांस खाऊ नका. आजारी दिसणाऱ्या सुस्त पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नका. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका, असेही आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत केले आहे.

Web Title: Poultry farmers should be careful about bird flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.