पोलादपूर : तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा देत महावितरण कंपनीचे विद्युत खांब वादळी वाऱ्याने वाकले तर काही ठिकाणी तारा तुटल्या होत्या. काही भागात हाय लाईन व लो लाईनचे सुमारे ४० पेक्षा जास्त खांबांची पडझड झाली होती. या पार्श्वभूमीवर महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन तब्बल ३६ तासानंतर वीज पुरवठा सुरळीत केला होता. मात्र एक दिवस वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पुन्हा महाड एमआयडीसी परिसरात बिरवडी अकले येथे मेन लाईनचा बिघाड झाल्याने रविवारी पुन्हा एकदा वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे नागरिकात संभ्रम निर्माण झाला. नेमकी वस्तुस्थिती काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र महावितरणचे अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत, सोमवारी सकाळपासून सतत वीज खंडित होत आहे.
पोलादपूरसाठी महाड एमआयडीसी व्हाया वीजपुरवठा जोडण्यात आल्याने गेली दोन वर्ष वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पोलादपूरच्या नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी महाड- राजेवाडी व्हाया वीजपुरवठा होत असताना तो सुरळीत होत असे, त्यामुळे पोलादपूरसाठी कोणतीही अडचण निर्माण होत नव्हती असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत महावितरणचे उप अभियंता सुनील सुद यांचेशी विचारणा केली असता ते म्हणाले की, राजेवाडी येथे कंडक्टर तुटला असल्याने व दोन फेज चालू आहेत. त्यामुळे या मागार्ने वीज पुरवठा सुरळीत करता येत नाही म्हणून व्हाया बिरवाडी येथूनच पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पाऊस व वादळी वारा यामुळे कामात व्यत्यय येत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही शर्थीने प्रयत्न करीत आहोत. हाय लाईन व लो लाईनचे विद्युत खांब कोसळून व वाकल्याने मोठे नुकसान झाले आहे यासाठी आवश्यक असणारे साहित्य आम्ही मागवून लवकरच काम पूर्ण करण्याचा प्रयत्नात आहोत.नागरिक संतप्तच्वारंवार होणाºया खंडित वीज पुरवठ्यामुळे तालुक्यात शासकीय कार्यालय इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. मोबाईल सेवा व बँकांची कामे ही रखडली आहेत.च्तर अनेक ठिकाणी नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे.च्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिसरात ठिकठिकाणी जाऊन युद्धपातळीवर काम हाती घेऊन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.