विजय मांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात विजेचे खांब कोसळले असून त्याचवेळी वीज रोहित्रेदेखील कोसळली आहेत. वीज रोहित्रे नादुरुस्त झाल्याने तालुक्यातील अनेक गावांच्या नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. दरम्यान, महावितरणकडून वादळात कोसळलेले २०० विजेचे खांब बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शुक्रवारी दिवस अखेर ५० खांब उभे करण्यात महावितरणला यश आले आहे. तर तालुक्यातील ग्रामीण भागातील काही भाग वगळता अद्याप येथे अंधार कायम आहे.
कर्जत तालुक्यात मुख्य वीजवाहिनीचे ६८ तर गावागावांत वीजपुरवठा करणारे १४० खांब वादळाने कोसळले आहेत. त्या कोसळलेल्या खांबांमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता आणि आता युद्धपातळीवर त्या खांबांची दुरुस्ती महावितरणकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, कर्जत आणि माथेरान येथील वीजपुरवठा ४ जूनच्या रात्री सुरू झाला आहे. तर कर्जतसह दहिवली, नेरळ, कडाव, कशेळे येथील वीजपुरवठा सुरू झाला असला तरी त्या त्या वीज उपकेंद्र परिसरातील सर्व गावांची वीज मात्र सुरू झाली नाही. ५ जूनपर्यंत वादळाने कोसळलेल्या एकूण खांबांपैकी जेमतेम ५० खांब उभे करण्यात महावितरणला यश आले आहे. त्याच वेळी ग्रामीण भागात आता विजेचे खांब उभे करण्याचे काम सुरू असून दुर्गम भागातील तुंगी येथेही विजेचे खांब वादळाने जमीनदोस्त झाले आहेत. शिंगढोल येथील विजेचे खांबही कोसळले आहेत. ग्रामीण भागात मागील तीन दिवस वीजपुरवठा खंडित असल्याने त्या त्या गावांतील नळपाणी योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांतील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागले.आदिवासी विभागात नुकसानच्आदिवासी विभागात सर्वाधिक नुकसान वादळाने केले असून तेथील नांदगाव, बळीवरे, रोकडेवाडा, खांडस नळपाणी योजना आणि पाटोळे फार्मजवळ असलेले वीज रोहित्र जमिनीवर कोसळले आहे.च्विजेचे खांब कोसळल्याने तालुक्यातील १४० नळपाणी योजना दोन दिवसांपासून बंद पडल्या आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.