तरुणांच्या पुढाकारातून वीजपुरवठा झाला सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 01:10 AM2020-06-25T01:10:01+5:302020-06-25T01:10:56+5:30

२१ दिवसांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांकडून या तरुणांचे कौतुक करण्यात येत आहे.

The power supply was smooth due to the initiative of the youth | तरुणांच्या पुढाकारातून वीजपुरवठा झाला सुरळीत

तरुणांच्या पुढाकारातून वीजपुरवठा झाला सुरळीत

Next

आगरदांडा : निसर्ग चक्रीवादळामुळे मुरूड तालुक्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे मुरुड तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर विजेच्या खांबांची पडझड होऊन नुकसान झाल्यामुळे शहरात वीजपुरवठा खंडित झाल होता. १९ दिवसांनी काही भाग सोडून वीजप्रवाह सुरू झाला, तोही काही तासांकरिता. यामुळे येथील नागरिक हैराण झाले होते. मात्र, भागेश्वर आळीतील तरुणांनी पुढाकार घेऊन महावितरणच्या परवानगीने विजेच्या खांबावर चढून काम सुरू के ले. यामुळे २१ दिवसांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांकडून या तरुणांचे कौतुक करण्यात येत आहे.
२१ दिवस झाले, तरी वीज येत नसल्यामुळे नागरिक विजेच्या समस्यांनी हैराण झाले. शेवटी भोगेश्वर तरुण मित्रमंडळाने वीज अधिकारी सचिन येरेकर यांची भेट घेऊन विजेच्या संदर्भात चर्चा केली. त्यावेळी तरुणांनी जर तुमच्याकडे पुरेसे वीज कर्मचारी नसतील, तर आमच्याकडे विजेचे काम करणारी अनुभवी मुले आहेत. आम्ही विजेच्या खांबावर चढून वीजपुरवठा सुरळीत करू, असे सांगितले. जर मान्यता देत असाल, तर फक्त मुख्य वाहिनीच्या विजेचे फ्यूज काढून द्या. पुढील विजेचे काम आम्ही करू, असे सांगण्यात आले. वीज मंडळाच्या अधिकारी सचिन येरेकरनी मान्यता दिली. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ज्येष्ठ नागरिक विजय गुरव यांच्या शुभ हस्ते विजेच्या कामांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला.
समीर पाटील व नयन भायदे यांच्या नेतृत्वाखाली विजेच्या कामाला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली. समीर पाटील, आदित्य माळी, महेश साबळे , तेजस भायदे यांनी २१ पोलवराच्या लाइन कट करून अंडरग्राउंड बॉक्सला जॉइंड करण्याचे काम केले. विजेचा प्रवाह अंडरग्राउंड बॉक्समध्ये आल्याने कामाला यश मिळाले. त्यानंतर, प्रत्येक खांबावरून वीजपुरवठा घराघरांत देण्यास सुरुवात केली. २१ दिवसांनी प्रत्येकाच्या घरात वीज आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त के ले.
>‘नागरिकांनी मदत
के ल्यास लवकर काम’
वीज रिपेरिंग करण्याकरिता लागणारा खर्च प्रति वर्गणी काढून करण्यात आला. आज सर्वांनी एकत्र येऊन भोगेश्वर उत्तर विभागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास हातभार लावला. त्यासाठी समीर पाटील, आदित्य माळी महेश साबळे, तेजस भायदे, नयन भायदे यांचे वीज मंडळाचे अधिकारी सचिन येरेकर यांनीही विशेष आभार मानले.
असेच प्रत्येक ओळीतून जर विजेतील अनुभवी तरुण पुढे आले, तर नक्कीच मुरुड तालुक्यातील वीजपुरवठा लवकरच सुरळीत होऊन मुरुड तालुका प्रकाशमय होईल.

Web Title: The power supply was smooth due to the initiative of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.