प्रबोधन जेनेरिक औषधपेढीचा माणगावात शुभारंभ

By admin | Published: May 28, 2017 02:53 AM2017-05-28T02:53:04+5:302017-05-28T02:53:04+5:30

प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्थेच्या माध्यमातून माणगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या, राज्यातील पहिल्या आयएसओ-९००१-२०१५ प्रमाणित जेनेरिक औषधपेढी

Prabodhan generic medicines are introduced in Mangaon | प्रबोधन जेनेरिक औषधपेढीचा माणगावात शुभारंभ

प्रबोधन जेनेरिक औषधपेढीचा माणगावात शुभारंभ

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्थेच्या माध्यमातून माणगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या, राज्यातील पहिल्या आयएसओ-९००१-२०१५ प्रमाणित जेनेरिक औषधपेढी, अल्प उत्पन्न गटातील गरजू रुग्णांकरिता महत्त्वाची सुविधा ठरली आहे. गरजूंनी त्याचा लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग, खनिकर्ममंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी केले आहे. प्रबोधन जेनेरिक औषधपेढीचे माणगाव येथे देसाई यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी देसाई बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत महाडचे आमदार भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ‘जेनेरिक औषधांचा वापर लाभदायक आहे. प्रबोधन औषधपेढी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालविण्यात येणार असल्याने गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील रु ग्णांना ५० ते १०० टक्के मोफत औषधे पुरविण्यात येणार आहेत. प्रबोधनचे जेनेरिक औषधांची माहिती देणारे मोबाइल अ‍ॅप (ढॠटर) ँ३३स्र२://ॅङ्मङ्म.ॅ’/स्रहि7ी्र या लिंकवरून डाउनलोड करून घेता येऊ शकते. तर याचे संकेतस्थळ ६६६.स्र१ुंङ्मँिंं४२ँंँिस्री्िर.ङ्म१ॅ असल्याची माहिती दिली.

Web Title: Prabodhan generic medicines are introduced in Mangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.