शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

अनंत गीतेच पुन्हा विजयी होणार- प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 1:39 AM

अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी भाजप अहोरात्र मेहनत घेत असून, अनंत गीते पुन्हा विजयी होऊन मंत्री म्हणून दिल्लीत जातील, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी महाडमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

दासगाव : रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी भाजप अहोरात्र मेहनत घेत असून, अनंत गीते पुन्हा विजयी होऊन मंत्री म्हणून दिल्लीत जातील, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी महाडमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला.आमदार प्रवीण दरेकर हे गेले दोन दिवस महाड आणि पोलादपूरमध्ये अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. भाजप-सेना-आरपीआय युतीचे उमेदवार अनंत गीते हे स्वच्छ चारित्र्याचे आणि भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले उमेदवार आहेत. अनंत गीते हे किमान दोन लाखांच्या फरकाने पुन्हा विजयी होतील, असा ठाम विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला. अनंत गीते हे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले असले तरी त्यांची विकासकामे मोठी आहेत. या विकासकामांवरच मतदारांचा विश्वास आहे. भारतात नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी सक्षम यंत्रणा उभी केली आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.सध्या राज ठाकरे यांनी, मोदी आणि शहामुक्त भारत असा प्रचार सुरू केला आहे, याबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी, राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी सभा घेणे हे कार्यकर्त्यांना पटलेले नाही, असेदेखील दरेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड