अलिबाग : सांसद आदर्श ग्राम योजनतील अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावात स्वच्छ पाणीपुरवठा व प्रत्येक घरात शौचालय बांधण्याच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी शुक्रवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या चिंचोटी सांसद आदर्श ग्राम योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. चिंचोटी गावातील सर्व नागरिकांचे आधार कार्ड, विविध दाखले देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करून ते काम पूर्ण करावे, रस्त्यांवर स्ट्रीट लाइटचे काम तातडीने पूर्ण करावे व याबाबतचा अहवाल सादर करावा. दिनदयाळ ग्रामज्योती योजनेनुसार प्रत्येक घराला ग्रिडद्वारे कनेक्टिव्हिटी देण्याचे प्रयोजन आहे. सर्व प्रस्तावित कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, सांसद आदर्श ग्राम योजनेतील कामे करताना काही अडचण असल्यास याबाबत मला माहिती दिल्यास त्याचा वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.बैठकीस सरपंच नरेंद्र तेलंगे, अपर जिल्हाधिकारी समीर कुर्तकोटी आदी उपस्थित होते.
स्वच्छ पाणी, घरोघरी शौचालयास प्राधान्य
By admin | Published: October 24, 2015 12:32 AM