दासगाव : रेल्वे कोकणात आल्यानंतर कोकणाचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. धावणाºया गाड्यांचाही कोकणवासीयांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे वाटत होते. मात्र परिस्थिती याउलट होऊन या कोकण रेल्वेमार्गाचा उपयोग व फायदा कोकण सोडून इतर राज्यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. ज्यांना याचा फायदा झाला पाहिजे ते कोकणवासीय मात्र यापासून वंचित आहेत. कोकणात धावणाºया लोकल गाड्या या प्रवासादरम्यान ठिकठिकाणच्या स्थानकांत अर्धा अर्धा एक एक तास थांबवून या मार्गावरून धावणाºया इतर राज्यांत जाणाºया जलद एक्स्प्रेस गाड्यांना पहिले प्राधान्य देण्यात येत आहे. याचा फटका कोकणात प्रवास करणाºया प्रवाशांना बसत असून त्यांना प्रवासामध्ये तीन-चार तास गाडीमध्ये बसून वेळ काढावा लागत आहे. एक तासाच्या प्रवासाला तीन तीन चार चार तास लागत असल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.सुरुवातीच्या काळात पनवेल ते रोहा, रोहा ते चिपळूण आणि पुढे गोव्यासह इतर राज्यांना हा रेल्वेमार्ग जोडण्यात आला. कोकणवासीयांच्या प्रगतीसाठी कोकण रेल्वेचा फायदा आजतागायत कधीच झाला नाही. कोकण रेल्वे हा कोकणवासीयांना मुंबईशी जोडणारा सर्वांत जवळचा स्वस्त मार्ग असला तरी कोकण रेल्वेच्या स्थानकांची उभारणी करताना ही स्थानके कोणतीही मोठी गावे अगर तालुक्यांच्या ठिकाणी येणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात आली. गाव आणि तालुक्यांच्या ठिकाणापासून लांब निर्जन ठिकाणी स्थानकांची उभारणी करूनही स्थानिक ग्रामस्थ रेल्वेकडे वळले असले तरी पर्यटकांनी मात्र रेल्वेकडे पाठ फिरविली. याचा फटका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह तळ कोकणात जाणाºया कोकण रेल्वेच्या उत्पन्नाला बसला. कोकणात धावणाºया आणि मुंबईशी जोडलेल्या गाड्यांचे उत्पन्न कमी, प्रवासी संख्या कमी अशी कारणे दाखवत लांब पल्ल्याच्या गाड्या, आॅनलाइन बुकिंग, रिझर्व्हेशन काउंटर यांसह अनेक सुविधा कोकण रेल्वेमधील स्थानकांना कधी मिळाल्याच नाहीत. पर्यायाने ‘कोकण रेल्वे’ नाव असलेल्या या रेल्वेमार्गावरून इतर राज्यांना जोडणाºया गाड्या धावत आहेत.कोकण रेल्वेच्या स्थानिक गाड्या कायम तोट्यातपनवेलपासून कोकणात धावणारी कोकण रेल्वे ही बहुतांशी सिंगल ट्रॅक आहे. यामुळे एकाच वेळी दोन गाड्यांचे वेळापत्रक असल्यास एक गाडी कोणत्या तरी स्थानकात उभी करून दुसºया गाडीला मार्ग मोकळा करून दिला जातो. कोकण रेल्वेच्या स्थानिक गाड्या कायमच तोट्यात असल्याचे दाखवल्यामुळे बाजूला उभी राहण्याची वेळ कोकणात धावणाºया गाड्यांवर नेहमी येते. कोकणवासीयांसाठी धावणाºया अप आणि डाऊन अशा दोन्ही म्हणजेच केवळ चार सुपर फास्ट गाड्या निघून जाण्याची वाट पाहत इतर गाड्या उभ्या असल्याचे चित्र संपूर्ण कोकणात पाहावयास मिळते. यामुळे कोकणातील या पॅसेजर गाड्या कधीही वेळेवर पोहोचत नाहीत.
रेल्वेमार्गावर जलद गाड्यांना प्राधान्य, लोकल पॅसेंजर गाड्या दोन ते तीन तास उशिरा, कोकणवासीयांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 6:47 AM