पनवेलमध्ये गरोदर माता रुग्णालय सुरू, संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 02:59 AM2020-08-04T02:59:03+5:302020-08-04T02:59:26+5:30

कोळीवाडा येथे २० खाटांचे प्रसूती केंद्र : संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश

Pregnant mothers hospital started in Panvel | पनवेलमध्ये गरोदर माता रुग्णालय सुरू, संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश

पनवेलमध्ये गरोदर माता रुग्णालय सुरू, संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश

googlenewsNext

कळंबोली/पनवेल : पनवेल महापलिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे गरोदर मातांच्या उपचारासाठी, तसेच प्रसूतीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. शासकीय रुग्णालयात याबाबत मोफत उपचार मिळूनही प्रसूतीसाठी गरोदर माता खासगी रुग्णालयाला प्राधान्य देत आहेत, पण गरिबांनाही याबाबत मोफत उपचार मिळावेत, यासाठी वेगळे गरोदर माता रुग्णालय स्थापन करण्याची मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्याने, या परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाने पनवेल-कोळावाडा येथे २० खाटांचे गरोदर माता रुग्णालय सोमवारपासून करण्यात आले आहे.

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात गरोदर माता यांच्यासह बाह्य आजारावर उपचार केले जात आहे, परंतु प्रशासनाकडून उपजिल्हा रुग्णालयास कोविड रुग्णालय करण्यात आले आहे. तेव्हा या ठिकाणी गरोदर माता यांच्यावरील उपचार, तसेच प्रसूतीसाठीची सोय महापालिकेकडून एमजीएम रुग्णालय कामोठे येथे करण्यात आली आहे. एमजीएम रुग्णालयही कोविड सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार, कोविड रुग्णावर येथे उपचार केले जात आहेत. कोविडची भीती असल्याने गरोदर माता प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयास प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे, परंतु गरिबांची हेळसांड लक्षात घेऊन संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी गरोदर माता यांच्या उपचारासाठी, तसेच प्रसूतीसाठी वेगळ्या रुग्णालयाची व्यवस्था करण्याची मागणी तत्कालीन जिल्हा चिकित्सक डॉ.प्रमोद गवई यांच्याकडे केली होती. त्यानुसार, पनवेल-कोळीवाडा येथे २० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. डॉ.स्वाती नाईक या रुग्णालयाचा कारभार सांभाळणार आहेत.

कंत्राटी पदे भरणार
स्वतंत्र गरोदर माता रुग्णालयासाठी डॉक्टर, परिचारिका, प्रयोग शाळा सहायक आदी पदांसाठी कंत्राटी पद्धतीने पदे भरली जाणार आहेत. त्याकरिता जिल्हा चिकित्सक
डॉ.सुहास माने, डॉ.नागनाथ येमपल्ले यांच्याकडून मान्यता दिली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात येणार आहे.
 

Web Title: Pregnant mothers hospital started in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.