कर्जत : ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या १८९ कर्जत विधासभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार ७९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, तर सुमारे ४५ हजार ८४० नवमतदारांची नोंदणी मागील पाच वर्षांत झाली आहे. २९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी - ठाकूर यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. कर्जत विधानसभा मतदारसंघात कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यांचा समावेश येतो. कर्जत विधानसभा मतदारसंघात पूर्वी म्हणजे २०१४ रोजी २ लाख ३३ हजार ९५० मतदार संख्या होती. यावर्षी वाढून २ लाख ७९ हजार ७९० झाली आहे. म्हणजेच ४५ हजार ८४० मतदारांची वाढ झाली आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात साधारण ७० टक्के मतदार नोंदणी झाली आहे. मतदान करण्यासाठी लागणाºया मतदान ओळखपत्राचे वाटप जलद गतीने सुरू आहे. जवळपास ९५ टक्के ओळखपत्रे वाटप झाली आहेत. मतदान केंद्रावर मोबाइल वापरास बंदी आहे त्यामुळे मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाऊ नये, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी - ठाकूर यांनी केले आहे. पूर्वी मतदान केंद्रावर मतदान स्लीप ग्राह्य धरली जात होती, आता ती ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही.कर्जत विधानसभा मतदारसंघात ३४३ मतदान केंद्रेकर्जत मतदारसंघात ३४३ मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये ३२६ मतदान केंद्रे मुख्य मूळ केंद्र आहेत. काही केंद्रात ग्रामीण भागात बाराशेच्या वर तर शहरी भागात चौदाशेच्या वर मतदार झाल्याने १७ केंद्रे ही सहाय्यकारी मतदान केंद्रे बनविली आहेत. तुंगी, पेठ, कळकराई, ढाक ही चार मतदान केंद्रे अतिदुर्गम भागातील आहेत. या संपूर्ण मतदान प्रक्रि येसाठी ४४ एसटी बसेस, ५ मिनी बस, ६४ जीप, ३ ट्रक, १ इतर अशा ११७ गाड्यांची व्यवस्था कर्मचारी व मतदान मशिन ये - जा करण्यासाठी केली आहे. चांदई येथील यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयात मतदान यंत्रे सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम ) बनविण्यात आला आहे.मावळ लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा.- कविता द्विवेदी,निवडणूक निर्णय अधिकारी