दासगाव : अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता मुंबई - गोवा महामार्गावर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून विविध ठिकाणी मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. कोकणातील प्रसिध्द अशा गणेशोत्सवाकरिता मुंबई, ठाणे, सुरत, बडोदा आदी ठिकाणाहून लाखो गणेशभक्त कोकणात दाखल होत असतात. प्रतिवर्षी मुंबई - गोवा महामार्गावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. मुळातच दुहेरी वाहतूक असलेल्या या महामार्गावरील रुंदीकरणाच्या कामात रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा दरवर्षीप्रमाणे यंदा चाकरमान्यांना प्रवासादरम्यान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी महामार्ग पोलीस प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे.महामार्गावर गणेशोत्सव काळात कायम अपघात, वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो आणि चाकरमान्यांना महामार्गावर तासन्तास ताटकळत बसावे लागते. चाकरमान्यांचे हाल होवू नयेत याकरिता महामार्गावर महामार्ग पोलीस विभागाने खारपाडा ते कशेडी दरम्यान जवळपास १६४ कर्मचारी तैनात केले आहेत. (वार्ताहर) 164 कर्मचारी तैनात केले आहेत. यामध्ये ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, १ पोलीस निरीक्षक, १६ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. महामार्गावर कांदळपाडा, रिलायन्स पेट्रोल पंप, वाकण फाटा, नातेखिंड अशा चार ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभी केली आहेत. कशेडी ते खारपाडा दरम्यान जेसीबी, चार रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
महामार्ग पोलीस प्रशासन सज्ज
By admin | Published: September 14, 2015 11:37 PM