आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त तर झाली आहेत, परंतु त्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवणार असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानेच तयार केला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या गाव-वाड्यांतील शौचालयांना पाणी कोठून उपलब्ध होणार, अशा गंभीर समस्येचा सामना नागरिकांसह प्रशासनालाही करावा लागणार आहे.मोठा गाजावाजा करून रायगड जिल्ह्यामध्ये हागणदारीमुक्तीचा नारा देण्यात आला. जिल्हा हागणदारीमुक्त झाला हे प्रत्येक रायगडवासीयांना अभिमानास्पद आहे. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली आहे. पाणी व स्वच्छता विभागाला जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, पोलीस, विविध कंपन्या, सामाजिक संस्था, नागरिकांची मोलाची मदत झाली.सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील तापमान कमालीचे वाढले आहे. नद्या, तलाव, विहिरी यांनी काही ठिकाणी तळ गाठायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून देखील योग्य नियोजनाअभावी सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. प्रचंड उष्णतेमुळे उपयोगात येणाºया पाण्याची वाफ होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यातील काही तालुक्यामधील काही गावे आणि वाड्यांना जाणवू लागल्या आहेत. डोक्यावर हंडा घेऊन मैलोनमैलचा प्रवास करून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. काही ठिकाणी तर, पिण्याच्या पाण्यासाठी अख्खी रात्र जागवून काढावी लागते तेव्हा कोठे दोन थेंब त्यांच्या हंड्यामध्ये पडतात. पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल आठ कोटी ६३ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये ३५४ गावे आणि ८७७ अशा एकूण एक हजार २३१ ठिकाणी संभाव्य पाणीटंचाई जाणवणार आहे.एवढ्या मोठ्या संख्येने पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवणार असल्याने दैनंदिन गरजेसाठी लागणाºया पाण्याच्या वापराबाबत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांमध्ये काय स्थिती असेल याचा विचारच केलेला बरा. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील याच तालुक्यातील गाव-वाड्यांमध्ये स्वच्छ भारत अभियानातून कोट्यवधी रुपये खर्च करून शौचालये उभारण्यात आली आहेत. परंतु याच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला वणवण करावी लागते ही खरी वस्तुस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत असताना शौचालयांसाठी पाणी कोठून उपलब्ध होणार, असा प्रश्न आहे.१जिल्ह्यात २१ गावे आणि ८२ वाड्या मिळून १०३ ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामध्ये पेण तालुक्यातील १८ गावे आणि ५६ वाड्या अशा ७४ ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असल्याने तेथे सात टँकरने पाणीपुरवठा प्रशासनाने सुरू केला आहे.२रोहे तालुक्यातील दोन वाड्यांमध्ये एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाड तालुक्यातील नऊ वाड्यांसाठी एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पोलादपूरमधील तीन गावे आणि १५ वाड्यामध्ये दोन टँकरने ग्रामस्थांची तहान भागवण्यात येत आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ७९६ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.३प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या आराखड्याप्रमाणे पेण, रोहे, महाड आणि पोलादपूरला टंचाई जाणवू लागल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. संभाव्य पाणीटंचाई आराखड्याप्रमाणे पाणीटंचाई निर्माण झाल्यास १५ तालुक्यातील एक हजार ८१० ठिकाणी पिण्याची पाणीटंचाई जाणवून तेथे बांधण्यात आलेल्या शौचालयांनाही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.रायगड जिल्ह्यातील १३५ दलघमी अंबा खोºयाचे पाणी शिल्लक आहे. (एक दलघमी म्हणजे १०० कोटी लीटर पाणी) त्या पाण्याचाही वापर करता येईल.हेटवणे धरणामध्ये १४४ दलघमी पाणी स्टॉकमध्ये आहे. त्यातील ९७ दलघमी पाणी वापरले जाते. उर्वरित ४७ दलघमी पाणी वापराविना समुद्राला जाऊन मिळते. (४७ दलघमी म्हणजे चार हजार ७०० कोटी लीटर पाणी)रायगड जिल्ह्यातील सांबरकुंड आणि बाळगंगा धरणे प्रस्तावित आहेत. ती तातडीने बांधून पूर्ण केली पाहिजेत. धरण बांधण्याआधी धरणातील ७० टक्के पाणी जिल्ह्यासाठी आरक्षित करून ठेवले पाहिजे.पावसाळ््यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. डोंगरावर कॅचिंग पॉइंट ओळखून तेथील पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून त्या पाण्याचा वापर करता येऊ शकतो.
पाणीटंचाईग्रस्त गावांचा अहवाल तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 2:48 AM