शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

गणेश विसर्जनाकरीता पोलीस सज्ज

By admin | Published: September 14, 2016 4:33 AM

अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील सर्वच गणपतींचे विसर्जन करण्यात येते. त्यासाठी गुुरुवारी पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार असून परिमंडळ-२ मध्ये पूर्णपणे सज्ज आहे.

अरुणकुमार मेहत्रे ,  कळंबोलीअनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील सर्वच गणपतींचे विसर्जन करण्यात येते. त्यासाठी गुुरुवारी पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार असून परिमंडळ-२ मध्ये पूर्णपणे सज्ज आहे. शहरातील जवळपास दहा हजार गणरायांना यादिवशी निरोप दिला जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.पनवेल आणि उरणमध्ये खाजगी व सार्वजनिक गणपतींची संख्या मोठी असून दहा दिवसांचे बाप्पांही दहा हजारांच्या घरात आहेत. गणरायांची प्रतिष्ठापनेपासून ते गौरी गणपती विसर्जन अतिशय शांतेतत पार पडले. यावेळी परिमंडळ-२ मध्ये पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या नेतृत्वाखाली उपाययोजना करण्यात आल्या होत्या. गुरुवारी दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येणार असून याकरीता पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. जवळपास साडे पाचशेहून अधिक पोलिसांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. बकरी ईद व अनंत चतुर्दशी एका पाठोपाठ आल्याने तीन दिवस पोलिसांच्या सुट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत. तसे आदेश नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी निर्गमीत केले आहेत. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९१५ गणपतींचे गुरुवारी विर्सजन करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. खारघरमध्ये १६०० गणरायांचे विसर्जन करण्यात येणार आहे. शहरी भाग असल्याने येथे जास्त बंदोबस्त लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त संवेदनशील असलेल्या कळंबोलीतही पोलिसांची करडी नजर असणार आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक कोंडीराम पोपेरे यांनी बंदोबस्तांचे नियोजन केले आहे. उरण विभागात उरण, न्हावाशेवा, मोरा सागरी येथेही विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्त राहणार आहे. खांदेश्वर, पनवेल शहर, कामोठे, तळोजा येथेही विसर्जनाच्या दिवशी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, याकरीता पोलीसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. सिडको वसाहतीत प्रत्येक सेक्टरला पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्या त्या पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याचे प्रकाश निलेवाड यांनी सांगितले. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी तसेच विर्सजन घाटावर टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. विसर्जनावर करडी नजर ठेवण्याकरीतो सीसी टिव्ही लावण्यात आले आहेत. त्याच्यावर पोलीसांचे नियंत्रण राहणार असल्याचे निलेवाड यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये या हेतून एक मार्गी पार्र्किं ग ठेवण्यात येणार असल्याची माहिती कळंबोली वाहतूक शाखेचे निरिक्षक गोरख पाटील यांनी दिली. विसर्जनघाटावर सूचना देण्याकरीता लाऊड स्पीकर, लाईट व स्टेजची व्यवस्था त्या त्या प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे.