शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत ‘पद्मदुर्ग जागर’ कार्यक्रम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 01:16 AM2020-12-23T01:16:11+5:302020-12-23T01:16:38+5:30
Murud : अभिषेक करण्यासाठी पुरोहित मंदार पेंडसे यांच्या मंत्रोपचाराने सारा परिसर भारावून गेला होता.
मुरुड : पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीचा ‘पद्मदुर्ग जागर’ हा कार्यक्रम २२ डिसेंबर रोजी शिवप्रेमींच्या मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संख्येची मर्यादा ठेवल्याने स्थानिक नागरिकांचा उत्साह मोठा दिसून आला. मुरुड शहरातील राधाकृष्ण मंदिरातून छत्रपती शिवरायांची पालखी विविध वाद्यांद्वारे बोटीमधून पद्मदुर्ग किल्ल्यावर नेण्यात आली. यावेळी कोटेश्वरी मातेचे मूळ स्थान असलेल्या जागी विधिवत कोटेश्वरी मातेचे पूजन करून महाराजांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. अभिषेक करण्यासाठी पुरोहित मंदार पेंडसे यांच्या मंत्रोपचाराने सारा परिसर भारावून गेला होता.
यावेळी खारआंबोली ग्रामस्थ मंडळातर्फे शिवकालीन मर्दानी खेळ तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठीचे खेळ उपस्थित शिवप्रेमींना पाहावयास मिळाली. महाराजांची पालखी गडावर फिरून प्रसादवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीचे अध्यक्ष अशीलकुमार ठाकूर, उपाध्यक्ष संकेत आरकशी, सहसचिव राहुल कासार, खजिनदार योगेश सुर्वे, महेंद्र मोहिते, महेश साळुंखे, अच्युत चव्हाण, रूपेश जामकर, सुनील शेळके, संतोष जंजीरकर व महिला मंडळ सर्व सभासद यांनी मोठी मेहनत घेत, हा कार्यक्रम यशस्वी केला.
‘इंग्रज, सिद्धीवर वचक ठेवण्यासाठी किल्ला उभारला’
- महाराजांची आरती घेऊन प्रमुख वक्ते इतिहास अभ्यासक अनिकेत पाटील यांनी छत्रपतींनी १,६७५ साली पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी करण्यास सुरुवात केली होती. छत्रपतींच्या मृत्युनंतरही पदमदुर्ग हा स्वराजाचा एक भाग म्हणून सिद्धिसोबत लढत
राहिला.
- १७१० साली हा पद्मदुर्ग किल्ल्यावर सिद्धीने ताबा मिळविला. आरमारी वर्चस्व राखण्यासाठी महाराजांनी पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी केली होती. इंग्रज व सिद्धीवर वचक राहावी यासाठी जलदुर्ग किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती, अशी माहिती पाटील यांनी दिली.