सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण, निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 03:42 AM2017-09-28T03:42:09+5:302017-09-28T03:42:22+5:30
अलिबाग : लोकमत आणि रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने, बँक आॅफ इंडिया व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहयोगाने आयोजित ‘रायगड जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ चा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी येथील पीएनपी नाट्यगृहात ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे राहणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे.
या वेळी निरुपणकार सचिन धर्माधिकारी व उमेश धर्माधिकारी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुंबई लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, लोकमत मीडिया प्रा.लि.चे उपाध्यक्ष विजय शुक्ला, बँक आॅफ इंडियाचे रायगड झोनल मॅनेजर विमल राजपूत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे आदी उपस्थित राहाणार आहेत.
जिल्ह्यातील २७४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत सहभागी झाली होती. प्रत्येक तालुकास्तरावर तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड तज्ज्ञ परीक्षकांच्या परीक्षण मंडळांच्या माध्यमातून केली होती. त्यातून जिल्हास्तरावर एकूण ११ सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तज्ज्ञ परीक्षकांच्या परीक्षण मंडळांच्या माध्यमातून पारितोषिकांकरिता निवड करण्यात आली आहे. पारितोषिके कोणाला मिळणार याबाबत गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कार्यक्रमाची जय्यत तयारी
पीएनपी नाट्यगृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता होणाºया सोहळ््याच्या तयारीकरिता पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे यांच्या नेतृत्वाखाली अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, जिल्हा वाहतूक पोलीस शाखा प्रमुख मनोज म्हात्रे यांच्या चमूने जय्यत तयारी केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बुधवारी दुपारी चार वाजता पीएनपी नाट्यगृहात येवून तेथील तयारीची जातीने पाहणी केली. यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष तथा पीएमपी नाट्यगृहाचे पदाधिकारी प्रशांत नाईक, पीएनपीचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक,पोलीस उप अधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे,अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, जिल्हा वाहतूक पोलीस शाखा प्रमुख मनोज म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचाही होणार गौरव
गोवा राष्ट्रीय महामार्ग दुरवस्थेत असतानाही गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात रवाना झालेल्या व परतलेल्या सुमारे ६ लाख वाहनांच्या गोवा महामार्गावरील वाहतुकीदरम्यान वाहतूककोंडी आणि वाहन अपघात होवू न देता विनावाहतूककोंडी वाहतूक सुरळीत ठेवण्यात यशस्वी वाहतूक पोलीस शाखेतील ११ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा प्रातिनिधिक गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.