‘राष्ट्रपतींची भेट ‘लोकमत’मुळे शक्य’
By admin | Published: June 28, 2017 03:25 AM2017-06-28T03:25:23+5:302017-06-28T03:25:23+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट आणि महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन प्रत्यक्ष घेणे, हे केवळ ‘लोकमत’च्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट आणि महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन प्रत्यक्ष घेणे, हे केवळ ‘लोकमत’च्या, ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेमुळेच शक्य झाले. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांतून आलेल्या स्पर्धकांनी व गायत्री राठोड हिने हे विविध अनुभव कथन करताना सांगितले.
‘लोकमत’ने २०१६मध्ये घेतलेल्या, ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेत हवाई सफरीचे बक्षीस जिंकलेली गायत्री ही रायगड जिल्ह्यातील एकमेव स्पर्धक होती. या स्पर्धेत राज्यातील शाळांमधून हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे, ३५ विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी २१ जून रोजी हवाई सफरीचा अनुभव घेतला. गायत्रीचा प्रवास हा मुंबई-दिल्ली-मुंबई असा होता. कधीही विचार केला नव्हता की, मला विमानात बसायला मिळेल; परंतु हे फक्त ‘लोकमत’मुळेच शक्य झाले. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यासमवेत फोटो काढता आले. त्यांना प्रत्यक्ष जवळून पाहताना अतिशय आनंद झाल्याचे गायत्रीने सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधीस्थान केवळ पुस्तकात पाहिले होते, ते स्थळ, तेथील वातावरण अनुभवताना किती आनंद झाला, हे शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचे गायत्रीने सांगितले.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आम्हाला करिअरबाबत आपुलकीने विचारले, सैन्यामध्ये भरती व्हायला किती जणांना आवडेल, असे उपराष्ट्रपतींनी विचारले असता, बहुतांश विद्यार्थ्यांनी हात वर
के लेत्यांचे अभिनंदन केल्याचे गायत्रीने सांगितले.