बाळासाहेबांची दाेन्ही स्वप्ने पंतप्रधान मोदींनी केली पूर्ण; एकनाथ शिंदे यांचे कर्जत येथे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 01:19 PM2024-01-08T13:19:34+5:302024-01-08T13:20:12+5:30

"मागील सरकारने विकासविरोधी धोरणे राबविल्याने अडीच वर्षांत महाराष्ट्र मागे गेला"

Prime Minister Modi fulfilled both the dreams of Balasaheb; Eknath Shinde felicitated at Karjat | बाळासाहेबांची दाेन्ही स्वप्ने पंतप्रधान मोदींनी केली पूर्ण; एकनाथ शिंदे यांचे कर्जत येथे गौरवोद्गार

बाळासाहेबांची दाेन्ही स्वप्ने पंतप्रधान मोदींनी केली पूर्ण; एकनाथ शिंदे यांचे कर्जत येथे गौरवोद्गार

लोकमत न्यूज नेटवर्क, कर्जत: मी मुख्यमंत्री असलो तरी कालही कार्यकर्ता होतो अन् आजही आहे, असे सांगत ३७० कलम हटवणे व श्री राम मंदिर उभारणे ही बाळासाहेबांची स्वप्ने होती, ती  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले. कर्जत शहरातील विविध २७२ कोटींच्या विकासकामांची उद्घाटने त्यांच्या हस्ते झाली. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, पुन्हा एकदा शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असल्याचे सांगत, आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळातील लाभाच्या योजनांची माहिती देत  आपण देणारे आहोत, घेणारे नाही, अशी टिप्पणी केली. मागील सरकारने विकासविरोधी धोरणे राबविल्याने अडीच वर्षांत महाराष्ट्र मागे गेला, आम्ही तो सव्वा वर्षात नंबर वन केला असल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीत ४८ जागा जिंकू, असा विश्वासही बोलून दाखवला.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, सदा सरवणकर यांच्यासह जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, संपर्कप्रमुख विजय पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखा ठाकरे, माजी सभापती अमर मिसळ, माजी उपसभापती मनोहर थोरवे, नगरसेवक संकेत भासे, पंकज पाटील, प्रमोद घोसाळकर, चाळके, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, विकास गोगावले, गोविंद बैलमारे, राहुल डाळिंबकर, नरेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Prime Minister Modi fulfilled both the dreams of Balasaheb; Eknath Shinde felicitated at Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.