संदीप जाधव, महाडयेथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. सोमवारी दोन गटात झालेल्या वादावादी आणि हाणामारी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात विद्यमान प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांच्यासह माजी प्रभारी प्राचार्य आरती वानखेडे, दलितमित्र मधुकर गायकवाड यांचाही समावेश आहे.डॉ. आंबेडकर महाविद्यालयात गेल्या दीड वर्षापासून प्राचार्यपदाचा वाद धुमसत असून न्यायालयाच्या निर्णयानुसार मागील महिन्यात प्राचार्यपदाचा वाद संपुष्टात आला होता. त्यानुसार डॉ. धनाजी गुरव हे सोमवारी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी गेले होते. प्रभारी प्राचार्य आरती वानखेडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार प्राचार्य धनाजी गुरव यांच्यासह रमेश पाटील, विनोद कांबळे, संजय पवार व अन्य साठ ते सत्तर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कांचन महाडिक यांनी पोलिसात आरती वानखेडे, महेंद्र वानखेडे, महेंद्र घारे, बशीर चिंचकर, मधुकर गायकवाड यांच्या विरोधात विरोधी तक्रार दाखल केली आहे. या परस्परविरोधी तक्रारीमुळे व महाविद्यालयात घडलेल्या वादाचे तीव्र पडसाद शहरात उमटत आहेत.
प्राचार्यपदाचा वाद पुन्हा उफाळला
By admin | Published: November 11, 2015 12:18 AM