पर्यटक सुरक्षा व सुविधांना प्राधान्य, जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 06:17 AM2017-09-16T06:17:13+5:302017-09-16T06:17:42+5:30
रायगड जिल्ह्याला लाभलेल्या समुद्रकिना-यांचा पर्यटन विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून जिल्ह्याचा विकास करता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाºयांवर सेवा-सुविधांचा विकास करताना पर्यटकांची सुरक्षा व सुविधा या गोष्टींना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी येथे दिले.
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्ह्याला लाभलेल्या समुद्रकिना-यांचा पर्यटन विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून जिल्ह्याचा विकास करता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाºयांवर सेवा-सुविधांचा विकास करताना पर्यटकांची सुरक्षा व सुविधा या गोष्टींना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी येथे दिले.
रायगड जिल्हा सागरतट व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल सागरतट अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. सागर तटावर पर्यटन सुविधा विकासासाठी जिल्ह्यातील नागाव-पिरवाडी (ता. उरण), अलिबाग तालुक्यातील मिळकतखार, आवास, किहिम, आक्षी, नागाव, रेवदंडा, मुरुड तालुक्यांतील काशिद, श्रीवर्धन तालुक्यांतील दिवेआगर व हरिहरेश्वर या गावांना निधी देण्यात आला आहे. या निधीच्या खर्चाचा आढावाही या वेळी घेण्यात आला. डॉ. सूर्यवंशी यांनी पर्यटकांना सुविधा देताना त्या त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असल्या पाहिजे याचा विचार व्हावा. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या गावांच्या पायाभूत सुविधा विकासासाठी विविध विभागांनी समन्वयातून प्रस्ताव तयार करावे. गावातील अन्य विकासाची कामे रोहयोमधून करता येतील, तसेच शाश्वत समुद्र किनारा विकास व्यवस्थापनातून जिल्ह्यातील काशिद या समुद्र किनाºयाचा विकास करण्यात येत असून त्यास हे मानांकन मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याच धर्तीवर वरसोली व किहिम या बीचेसचाही विकास करण्याबाबत उपाययोजना होत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी, एशियन डेव्हल्पमेंट बँकेचे उपसंचालक व समन्वयक जितेंद्र रायसिंघानी, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, बंदर अधीक्षक अरविंद सोनवणे, रोहयो उपजिल्हाधिकारी पी.एस. जैतू, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच सर्व किनारा विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या मार्गी लावणार
रायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झाली असून लवकरच रस्त्यांच्या कामास वेगाने सुरु वात होईल. त्यामुळे चांगले दळणवळण उपलब्ध होईल. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या मार्गी लावल्या जातील, असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, टूर आॅपरेटर्स, पर्यटन केंद्र चालक आदींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे एशियन डेव्हल्पमेंट बँकेचे उपसंचालक समन्वयक जितेंद्र रायसिंघानी, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, बंदर अधीक्षक अरविंद सोनवणे तसेच हॉटेल व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या समस्या जिल्हाधिकाºयांपुढे मांडल्या. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, जिल्ह्यात सध्या केवळ शनिवार-रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पर्यटकांचा हा गट येत असतानाच अन्य प्रकारच्या पर्यटन संधींची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवून पर्यटकांचा अन्य प्रकारचा गट जो अधिक दिवस येथे वास्तव्य करेल, येथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देईल, येथील समुद्र किनाºयांसोबतच पर्वत भ्रमंतीसही प्राधान्य देईल,
अशा वेगवेगळ्या गटात पर्यटक येतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी, स्थानिक लोकांचे सूक्ष्म कौशल्य विकास प्रशिक्षण, स्थानिकांच्या सहभागातून स्वच्छता व सुरक्षितता यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.