‘बेशिस्त पार्किंग’ची समस्या गंभीर, बिघडते आहे सामाजिक स्वास्थ्य, अनेक ठिकाणी होतेय वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 04:38 AM2017-10-31T04:38:50+5:302017-10-31T04:39:36+5:30

सामाजिक समस्या स्थानिक स्वराज्य संस्था वा स्थानिक प्रशासनाने दूर केल्याच पाहिजेत असा अट्टाहास आणि आग्रह जनसामान्यांचा असतो, परंतु सामाजिक समस्या निर्मितीस आपणही एक कारण बनतो आहेत, याचा मात्र सोईस्कररीत्या विसर पडतो.

The problem of 'unguarded parking' is serious, dysfunctional, social health, conflicts in many places | ‘बेशिस्त पार्किंग’ची समस्या गंभीर, बिघडते आहे सामाजिक स्वास्थ्य, अनेक ठिकाणी होतेय वादावादी

‘बेशिस्त पार्किंग’ची समस्या गंभीर, बिघडते आहे सामाजिक स्वास्थ्य, अनेक ठिकाणी होतेय वादावादी

Next

- जयंत धुळप

अलिबाग : सामाजिक समस्या स्थानिक स्वराज्य संस्था वा स्थानिक प्रशासनाने दूर केल्याच पाहिजेत असा अट्टाहास आणि आग्रह जनसामान्यांचा असतो, परंतु सामाजिक समस्या निर्मितीस आपणही एक कारण बनतो आहेत, याचा मात्र सोईस्कररीत्या विसर पडतो आणि अल्पावधीतच ती एक गंभीर सामाजिक समस्या बनते. याचा प्रत्यय सध्या जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्यालाच बाधा ठरत असलेल्या बेशिस्त ‘वाहन पार्किंग’ या समस्येतून सर्वांना येत आहे.
शहरातील विशेषत: नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. या रुंदीकरणाकरिता त्या रस्त्यांवर राहणाºया नागरिकांनी आपल्या नव्या इमारती बांधताना, नव्या शहर विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणाकरिता जागा देखील दिली. परंतु या रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवर २४ तास चारचाकी वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात. परिणामी रस्ता रुंदीकरण करून देखील त्यापैकी ५० टक्के रस्ता कायमस्वरूपी या बेदरकार पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे अडून राहिलेला असतो. याबाबत वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला तर बेदरकार वाहन पार्किंग करणाºयांकडून मोठी नाराजी व्यक्त होते, तर रस्त्यावर यामुळे वाहतूककोंडीचा सतत त्रास होत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणारे वाहन चालक ‘वाहतूक पोलीस झोपले आहे का’ असा प्रश्न उपस्थित करुन वाहतूक पोलिसांनाच जबाबदार धरतात, अशी व्यथा एका वाहतूक पोलिसानेच ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त के ली.
वाहन पार्किंग करताना दुसºयाला त्रास होणार नाही, याचा विचारच वाहन चालक करीत नाहीत. शहरातील निवासी सोसायट्या प्रवेशद्वारांवर ठळक अक्षरात ‘प्रवेशद्वारासमोर वाहने पार्किंग करू नये’ अशा सूचना लिहिलेल्या आहेत. त्या वाचूनही त्याच प्रवेशव्दारासमोर वाहने पार्क करण्याची मानसिकता क्लेशदायी असल्याचे एका निवासी वसाहतीत राहाणाºया ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. प्रवेशद्वारासमोर वाहन पार्क करू नका, आम्हाला जा-ये करण्यास अडचण होते, अशी विनंती केली असता, वाहन चालक प्रतिप्रश्न करतात, ‘मग आम्ही आमची गाडी कुठे पार्क करायची’ आणि येथे अनेकदा मोठा वाद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात सर्वसाधारणपणे बँकांच्या समोर मोठ्या प्रमाणात बेदरकार पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी आणि त्यातून उद्भवणारे वादाचे प्रसंग हे नित्याचेच झाले आहे. ही सारी परिस्थिती टाळण्याकरिता बँकेने आपला एक कर्मचारी जर हे वाहतूक व्यवस्थापन करण्याकरिता तैनात केला तर हा प्रश्न सुटू शकतो. परंतु कोणतीही बँक याचा विचारच करीत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक महिलांनी दिली आहे. मोठी दुकाने आणि हॉटेल्स यांच्या समोर रस्त्यांवरच अस्ताव्यस्त आणि बेदरकार पार्किंग असते. त्यांच्याकडे आलेल्या गिºहाईकांचीच ही वाहने असतात. त्यांचा व्यवसाय देखील त्यातून वाढत असतो, अशा वेळी त्या दुकान मालकांनी वा हॉटेल व्यावसायिकांनी आपला एक कर्मचारी नेमून गाड्यांचे पार्किंग व्यवस्थित होईल याची काळजी घेतली तर वाहतूक कोेंडी होणार नाही, परंतु हे कुठेही होत नसल्याने समस्या आणि त्या निमित्ताने वाद सर्वत्र वाढत आहेत, अशी परिस्थिती एका व्यावसायिकानेच मांडली आहे.

बेशिस्त पार्किंग ठरतोय वादाचा विषय
मुळात बेदरकारपणे बेशिस्त पार्किंग करून ठेवलेल्या मोटारसायकल आणि स्कूटर्सवर बसून गप्पा मारणारे हा एक मोठा वादाचा विषय सर्वत्र दिसून येतो.
ज्याची मोटारसायकल वा स्कूटर असते तो माणूस आपले काम आटोपून आला की त्याचा हमखास त्याच्या गाडीवर बसलेल्या माणसाबरोबर मोठा वाद होतो, प्रसंगी मारामाºया देखील झाल्या आहेत.
परंतु मुळात बेदरकार पार्किंग करणारे आणि त्यांच्या गाड्यांवर बसून गप्पा मारणारे या दोघांच्याही हे लक्षात येत नाही की आपण दोघेही चुकीचे वागतो आहेत. या मानसिकतेवर कोणी उपाय काढायचा असा सवाल या निमित्ताने एका सरकारी अधिकाºयांनीच केला आहे.

वाहन मालकांची स्वयंशिस्त हाच उपाय
१वाहतूककोंडीची समस्या,बेदरकार पार्किंग ही एक सामाजिक समस्या बनली आहे, हे वास्तव आहे. परंतु यावर उपाय केवळ पोलीस आणि कायदा हा असू शकत नाही. वाहन मालकांची स्वयंशिस्त यातूनच ही समस्या सुटू शकते आणि त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याची अपेक्षा अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.

रुग्णवाहिका देखील ताटकळतात
२अलिबागमधील सरकारी रुग्णालय आणि जिल्ह्यातील सर्व ठिकाणची सरकारी रुग्णालये येथील पार्किंगची समस्या मोठी गंभीर आहे. या रुग्णालयाच्या मार्गावर अस्ताव्यस्त पार्किंग करुन ठेवलेल्या वाहनांमुळे आजारी वा अपघातग्रस्त रुग्णाला रुग्णालयात घेवून जाणाºया रुग्णवाहिकांना रस्त्यात ताटकळत थांबावे लागते, यासारखी दुसरी असंवेदनशीलता नाही अशी समस्या एका सरकारी वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितली. रस्त्यातील वाहन बाजूला करा, रुग्णवाहिकेत रुग्ण आहे, त्याला रुग्णालयात नेण्यात येत आहे, असे सांगणाºया रुग्णवाहिका चालक आणि त्याचा सहकारी यांना मारहाण झाल्याचे प्रकार देखील जिल्ह्यात घडले आहेत.

Web Title: The problem of 'unguarded parking' is serious, dysfunctional, social health, conflicts in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड