शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

आश्रमशाळा की समस्यांचे आगार? कर्जत तालुक्यातील शाळांची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 3:16 AM

कर्जत तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात चाफेवाडी, डोंगरपाडा, पिंगळस, भालीवडी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहेत. तालुक्यातील विविध भागांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. येथे अनेक अडचणी असून, आश्रमशाळेत अनेक पदेही रिक्त आहेत.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात चाफेवाडी, डोंगरपाडा, पिंगळस, भालीवडी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहेत. तालुक्यातील विविध भागांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. येथे अनेक अडचणी असून, आश्रमशाळेत अनेक पदेही रिक्त आहेत.आश्रमशाळांच्या इमारतीला, वसतिगृहाला तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला गळती लागलेली आहे. अशा ठिकाणी छतावर प्लॅस्टिक टाकण्यात आले आहे. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, स्वच्छतागृहाची दुरवस्था तर काही ठिकाणी शिक्षक, कनिष्ठ लिपिक, स्वयंपाकी, कामाठी तर काही ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक अशी अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत.पिंगळस आश्रमशाळाकर्मचाºयांची घरे गळकीचाफेवाडी येथील आश्रमशाळेत १९२ मुले व १८६ मुली असे एकूण ३७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील इमारतीच्या स्लॅबला अनेक ठिकाणी गळती लागली आहे.अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठमोठे दगड रस्त्यावर आले आहेत. शाळा परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.विशेष म्हणजे चाफेवाडी आश्रमशाळेत २००९ पासून कर्मचारी निवासस्थानाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.बांधकाम विभागाने ही इमारत अर्धवट सोडल्याने कर्मचाºयांना राहण्यास अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही या निवासस्थानांच्या इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही.भालीवडी आश्रमशाळाविजेअभावी अंधारात, सोलर प्लॅन्टही बंदपिंगळस येथील आश्रमशाळेत २५० मुले व १९२ मुली असे एकूण ४३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे शाळेची इमारत सुसज्ज आणि पुरेसा कर्मचारीवर्ग असला तरी इमारतीत वीज जोडणी करण्यात आलेली नाही.विजेचे खांब येऊन पडले आहेत, परंतु हे काम अर्धवट आहे. वारंवार खंडित होणाºया वीज पुरवठ्यामुळे येथील मुलांना अभ्यासाला अडथळा निर्माण होतो.गरम पाण्यासाठी असणार सोलर प्लॅन्ट देखील बंद आहे. परिणामी भरपावसात मुलांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. कर्मचारी राहतात ती इमारत देखील जीर्ण अवस्थेत आहे.संरक्षक भिंतीअभावी विद्यार्थी असुरक्षितभालीवडी येथील आश्रमशाळेत मुली ५१३ व ३ मुले असे एकूण ५१६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे एक कनिष्ठ लिपिक आणि दिवसाच्या सुरक्षारक्षकाची कमतरता आहे.वसतिगृहाची इमारत जुनी असल्याने वसतिगृहाचे छप्पर गळत आहे. त्यामुळे ५०० विद्यार्थी राहू शकतील असे सुरक्षित वसतिगृह नव्याने उभारावे, अशी मागणी येथील विद्यार्थी आणि शिक्षकांची आहे.भालीवडी आश्रमशाळेच्या संरक्षक भिंतीचे आणि पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम आदिवासी विभागाच्या ठेकेदारांनी अपूर्ण ठेवले आहे. संरक्षक भिंत नसल्याने आश्रमशाळेची सुरक्षा येथे धोक्यात आहे. कर्जत तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये अनेक समस्या आहेत, त्याबाबत शासनाने सत्वर उपाययोजना करणे गरजेचे आहे.डोंगरपाडा आश्रमशाळाशाळेची सुरक्षा वाºयावरडोंगरपाडा येथील आश्रमशाळेत ३४९ मुली व २७० मुले असे एकूण ६१९ विद्यार्थी आहेत. येथे एक क्लार्क व दोन कामाठी यांची पदे रिक्त आहेत.शासनाने येथील सुरक्षारक्षक पदच रद्द केल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाºयावर असून त्याचा अन्य कर्मचाºयांवर ताण येत आहे. काही ठिकाणी शाळेच्या इमारतीचे पत्रे फुटले असून प्लॅस्टिक टाकण्यात आले आहेत.ही जुनी इमारत असल्याने ही इमारत नव्याने चांगल्या दर्जाची बांधण्यात यावी, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. येथील स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.चाफेवाडी आश्रमशाळाकर्मचाºयांची घरे गळकीचाफेवाडी येथील आश्रमशाळेत १९२ मुले व १८६ मुली असे एकूण ३७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील इमारतीच्या स्लॅबला अनेक ठिकाणी गळती लागली आहे.अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठमोठे दगड रस्त्यावर आले आहेत. शाळा परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.विशेष म्हणजे चाफेवाडी आश्रमशाळेत २००९ पासून कर्मचारी निवासस्थानाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.बांधकाम विभागाने ही इमारत अर्धवट सोडल्याने कर्मचाºयांना राहण्यास अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही या निवासस्थानांच्या इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही.एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी बांधकाम अभियंत्याकडे पाठपुरावा करीत आहेत, मात्र ते काम करण्याकरिता येतच नसल्याने मोठी अडचण आहे. पेण प्रकल्पांतर्गत सर्व आदिवासी आश्रमशाळांना प्रत्येकी पाच लाख रुपये स्थानिक व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा केलेले आहेत. त्यातील एक लाख रुपये विद्यार्थ्यांच्या आरोग्य उपचाराकरिता तर चार लाख दुरुस्ती कामाकरिता मुख्याध्यापकांनी वापरायचे आहेत. तसे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.- डी.डी.काळपांडे, सहायक प्रकल्प अधिकारी, पेण आदिवासी प्रकल्पपेण आदिवासी प्रकल्पांतर्गत एकूण १६ आदिवासी आश्रमशाळा आहेत. आदिवासी विकास विभागाने त्यांच्या कामांसाठी स्वतंत्र बांधकाम विभाग सुरू केला आहे. परंतु पेण आदिवासी प्रकल्प बांधकाम विभागासाठी केवळ एक अभियंता असल्याने, ते अपेक्षित प्रमाणात वेळ देवू शकत नसल्याने या बांधकामविषयक समस्या आहेत. आम्ही एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करीत आहोत.- अशोक जंगले, सामाजिक कार्यकर्ते, दिशा केंद्र, कर्जतचाफेवाडी शाळेचे स्लॅब गळत आहेत, तसेच अंतर्गत रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. शाळेच्या आवारात चिखल जमा होत आहे आणि विशेष म्हणजे २००९ साली सुरू करण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीचे काम अद्याप अपूर्ण असल्याने कर्मचाºयांना राहण्याच्या अडचणी निर्माण होत आहे. ही इमारत लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.- आर. एस. चव्हाण, मुख्याध्यापक, आश्रमशाळा चाफेवाडीडोंगरपाडा आश्रमशाळेत एक क्लार्क आणि दोन कामाठी अशी तीन पदे रिक्त आहेत, तसेच सुरक्षारक्षक पद शासनाने रद्द केले आहे. ही पदे आवश्यक आहेत. शालेय इमारत जुनी असल्याने नवी इमारत होणे अपेक्षित आहे.- संजय मागाडे, मुख्याध्यापक, डोंगरपाडा

टॅग्स :Raigadरायगड