भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात समस्या; मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 10:49 PM2020-02-06T22:49:02+5:302020-02-06T22:49:20+5:30

प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची प्रवासी संघटनेची मागणी

Problems with Bhiwapuri Road Railway Station; Request for Central Railway Administration | भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात समस्या; मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन

भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात समस्या; मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन

Next

नेरळ : मध्य रेल्वेच्या मेनलाइनवरील कर्जत दिशेकडील भिवपुरी रोड हे रेल्वे स्थानक आज महत्त्वाचे रेल्वे स्थानक बनले आहे. त्या स्थानकातील प्रवाशांना भेडसावणाºया बाबींवर तेथील प्रवासी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या स्थानकातील समस्यांबाबत येथील रेल्वे प्रवासी संघटनेने मुंबईत जाऊन निवेदन दिले आहे. कर्जत दिशेकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाला मोठा इतिहास आहे. त्या स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून मागील काही वर्षांत सातत्याने विकासकामांकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.

या स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल बांधला आहे, त्याबाबत निर्माण झालेल्या समस्या आणि तेथे पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या नाल्यांचा मार्ग कमी करण्याचा झालेला प्रयत्न यामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना यांच्याकडून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय महाव्यवस्थापक गोयल यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. त्या वेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड, कार्याध्यक्ष गणेश मते, सचिव विनोद बार्नेकर, उपाध्यक्ष भरत कांबरी, राजेश विरले, खजिनदार महेश कडव आणि काही कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात कर्जत दिशेकडे बनविण्यात आलेला पादचारी पुलावरून दोन्ही दिशेला जाण्यासाठी रस्ते बनवले आहेत. मात्र, ते दोन्ही रस्ते हे अर्धवट आहेत. त्यात पूर्व दिशेकडे असलेल्या बार्डी गावाकडे जाणाºया रस्त्यापर्यंत म्हणजे जिल्हा परिषदेने बनविलेल्या रस्त्यापर्यंत तो रस्ता जोडला जावा. त्याच वेळी पश्चिम दिशेकडे असलेल्या डिकसळ गावाकडे असलेल्या रस्त्याचा भाग हा डायमंड रेसिडेन्सीपर्यंत जोडला जावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.

तर त्याच भागात डिकसळ भागातील पाणी वाहून नेणारी पाइपमोरी होती, ती पाइपमोरी तेथील बांधकाम व्यवसाय करणाºया व्यावसायिकाने कमी आकाराचा नाला बांधून निमुळती केली आहे. त्यामुळे त्या भागातील पाणी पूर्वीसारखे पलीकडे वाहून जात नाही. यामुळे येथे पाऊस पडल्यानंतर पाणी साचून राहत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. दोन तास सलग पाऊस सुरू राहिल्यास तेथील रेल्वेमार्गात पाणी साचून त्याचा परिणाम वाहतुकीवर अनेकदा होताना दिसला आहे. त्या भागात पाणी वाहून नेण्यासाठी मोठ्या आकाराची पाइपमोरी टाकण्यात यावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.

Web Title: Problems with Bhiwapuri Road Railway Station; Request for Central Railway Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.