माथेरान : माथेरानमध्ये आगामी काळात पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. त्या दृष्टीने स्थानिकांना तसेच येणाऱ्या पर्यटकांना मिनीट्रेनबाबतीत काही तक्रारी अथवा अडचणी असल्यास त्या सकारात्मक दृष्टीने मार्गी लावण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी जनरल मॅनेजर डी. के. शर्मा आणि डिव्हीजन रेल्वे मॅनेजर आर. के. गोयल यांनी माथेरानकरांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी दोन्ही अधिकाऱ्यांचे स्वागत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केले.रेल्वेच्या वेळापत्रकाबाबतीत पर्यटकांच्या उदासीनतेबाबत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी अधिकाºयांना लेखी निवेदन दिले. या वेळी नगरपरिषद गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, नगरसेवक शिवाजी शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, एक सदस्य समितीचे जनार्दन पार्टे, मनोहर रांजणे, नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे, नितीन सावंत यांसह अन्य लोकप्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.माथेरानमध्ये मिनीट्रेनचे पर्यटकांना आकर्षण असून, ट्रेनमधून सफर करण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात; परंतु या मिनीट्रेनच्या फेºया अनियमित असल्याने पर्यटकांची गैरसोय होते, त्यामुळे पहाटे नेरळ येथून सुटणाºया तसेच माथेरानमधून नेरळकडे रवाना होणाºया वेळापत्रकात बदल करण्यात यावा. पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या सोडण्यात याव्यात, त्याचप्रमाणे इथे मालवाहतुकीची गहन समस्या निर्माण झाली आहे. त्याकामी पूर्वीप्रमाणे मालगाडी सुरू केल्यास रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात निश्चितपणे वाढ होईल, असेही सावंत यांनी सुचविले.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या माथेरानकरांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:23 PM