कर्जतमध्येही प्रथमच होणार हळदीवर प्रक्रि या

By admin | Published: March 23, 2016 02:18 AM2016-03-23T02:18:53+5:302016-03-23T02:18:53+5:30

तालुक्यात आजपर्यंत पारंपरिक भातशेतीच केली जात होती, परंतु काही तरुण शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रथमच हळदीची लागवड केली

The process for the first time will be done in Karjat | कर्जतमध्येही प्रथमच होणार हळदीवर प्रक्रि या

कर्जतमध्येही प्रथमच होणार हळदीवर प्रक्रि या

Next

विजय मांडे,  कर्जत
तालुक्यात आजपर्यंत पारंपरिक भातशेतीच केली जात होती, परंतु काही तरुण शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रथमच हळदीची लागवड केली आणि विशेष म्हणजे कमी जागेत हळदीचे भरघोस पीक घेत लाखोंचे उत्पन्न मिळविले.
हळदीवर प्रक्रि या करणाऱ्यांसाठी आवश्यक बॉयलर मशिन उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील हळदीचे विक्र मी पीक घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्याला बॉयलर मशिनचे वाटप केले आहे. त्यामुळे तालुक्यातील हळदीचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना हळदीवर प्रक्रि या करण्यासाठी यापुढे तालुक्याबाहेर जावे लागणार नाही.
रायगड जिल्हा कृषी विभाग आणि पंचायत समिती, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी तिवरे येथे तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे उद्घाटन आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती अरविंद म्हात्रे, जि. प. सदस्य सुदाम पेमारे, माजी अर्थ व बांधकाम सभापती पुंडलिक पाटील, माजी सभापती तानाजी चव्हाण, सभापती सुवर्णा बांगारे, उपसभापती मनोहर थोरवे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी बाळसाहेब पाटील, विनय वेखंडे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. लक्ष्मण चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मेळाव्यात कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतीचे महत्त्व पटवून देत फक्त भातशेतीवर अवलंबून न राहता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत पिके घ्यावी किंवा शेतीला पूरक व्यवसाय करावा, असे आवाहन करीत त्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. यामध्ये कृत्रिमरीत्या मधनिर्मिती, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आदीबाबत वैशाली सावंत यांनी माहिती दिली.

Web Title: The process for the first time will be done in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.